अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी साखर नियतन -NNL


नांदेड|
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2022 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन मंजूर केले आहे. 

या तीन महिन्यासाठी शासनाकडून 2 हजार 138 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 235 , अर्धापूर 22.50, मुदखेड 27, कंधार 95.50, लोहा 52, भोकर 98, उमरी 67, देगलूर 134.50, बिलोली 114.50, नायगाव 40, धर्माबाद 74.50, मुखेड 202, किनवट 467.50, माहुर 207, हदगाव 203, हिमायतनगर 98  एकूण 2 हजार 138  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी