लोहा तालुक्यातील धावरी येथील शिवारात ऊसतोड कामगारांवर वीज कोसळून तीन जण ठार -NNL

बाप लेकीसह कामगाराचा समावेश


उस्माननगर, माणिक भिसे।
तालुक्यातील धावरी तांडा परिसरात काम करणाऱ्या मजुरावर मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी पाचच्या सुमारास वीज कोसळली. यात तीन जण ठार झाले. तर जखमी बालिकेला  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लोहा तालुक्यातील धावरी तांडा शिवारामध्ये काही ऊसतोड मजूर काम करत होते. आज दुपारपासूनच सर्वत्र ढग भरून आल्याने अचानक सायंकाळी वादळी वारे, विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. एका झाडाचा आसरा घेण्यासाठी कामगार माधव पिराजी डुबुकवाड (वय 45) राहणार पानभोसी, तालुका कंधार, मोतीराम शामराव गायकवाड (वय 46) राहणार पेठ पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी आणि दहा वर्षीय बालिका रूपाली पोचिराम गायकवाड हिच्यावर वीज पडली. यात तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. तर पूजा माधव डुबुकवाडी बालिका गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी