नांदेड। पिक विमा बाबत पिक विमा कंपनीने दिलेले टोल फ्री क्रमांक आणि मेल आयडी चुकीचे असल्यामुळे संबंधित कंपनीला तातडीने नुकसान झालेली माहिती कळविणे अशक्य झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामुळे नुकसान भरपाई साठी अडचण येऊ नये ही बाब जिल्हा कृषी अधीक्षक यांना कळविण्यात आली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकाची माहिती ज्या मेल आयडीवर पाठवण्यात आली तो मेल आयडी चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे टोल फ्री नंबर सुद्धा लागत नव्हता तो पण सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिक विमा कंपनीने बदललेला अध्यावत क्रमांक प्रत्यक्ष पिक विमा भरलेल्या व्यक्तींना कळविणे बंधनकारक असताना शासकीय यंत्रणा किंवा कंपनीने कळविलेले नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यामुळे नुकसान भरपाई नाकारण्यात येऊ नये अशी अपेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक श्री चलवदे यांच्याकडे ज्येष्ठ पत्रकार तथा प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वय श्री गोविंद मुंडकर यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक श्री चलवदे यांनी विशेष लक्ष देणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांकडून कळाले.