धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रेस देगाव चाळ येथून प्रारंभ; महिला उपासकांनी केले भिक्खू संघाचे जोरदार स्वागत
नांदेड| राजकीय स्वार्थापोटी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आपापले सवतेसुभे उभे केले आहेत. कार्यकर्त्यांची कमी पण नेत्यांची संख्या वाढलेली आहे. आपण आपापसांतील गट तप आणि हेव्यादाव्यामुळे आपण कधीही एकत्र येत नाही. यामुळे संविधानद्रोही, लोकशाहीविरोधी तसेच व्यवस्थेचे लांगूलचालन करणाऱ्या शक्तींचे फावत आहे. आपण आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यातच मश्गूल आहोत. यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. बौद्धांनी आता संघटीत होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन येथील आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात आयोजित धम्मदेसना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सुनंद यांच्यासह भिक्खू संघ, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, अशोक मल्हारे, प्रभु ढवळे, प्रकाश ढवळे, अनिल थोरात, संजय कदम, संयोजक सुभाष लोखंडे, गायक क्रांतीकुमार पंडित, समाजभूषण गयाबाई कोकरे आदींची उपस्थिती होती.
वर्षावास संपल्यानंतर तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या भिक्खू संघाच्या धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रेस शहरातील देगाव चाळ येथून प्रारंभ झाला. पोलिस मुख्यालयाजवळ आल्यानंतर बौद्ध उपासक उपासिका आणि महिलांनी भिक्खू संघाचे जोरदार स्वागत केले. वाद्यसंगितात संघावर पुष्पवृष्टी करीत विहाराकडे पाचारण करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप व पुष्प पूजन आणि भोजनदानानंतर उपासकांच्या याचनेवरुन त्रिसरण पंचशील दिले. भिक्खू श्रद्धानंद यांनी गाथापठण केले. त्यानंतर भदंत पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, २०२४ ला आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर आपण गाफिल राहिलो तर यापुढे कठीण दिवस येण्याची शक्यता आहे. या देशात लोकशाहीवरच हल्ला करून संविधान नष्ट करण्याचे आजच्या सत्ताधारी लोकांनी षडयंत्र चालविले आहे. आता वाडी तांड्यावरच्या गोरगरीबांची मुले शिकत असलेल्या शाळा सरकार बंद करीत आहेत. भविष्यात शिक्षणबंदीच होण्याची शक्यता आहे. आपण एकत्र आलो नाहीत तर बौद्धांना कधीच अच्छे दिन येणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर प्रास्ताविक सुभाष लोखंडे आणि आभार मानले. आशिर्वाद गाथेने आणि समाजभूषण गयाबाई कोकरे यांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळबाजी थोरात, सतीश हिंगोले, माणिकराव हिंगोले, अशोक खाडे, मंगेश खाडे, विजय पंडित, नामदेव गोडबोले विपिन हिंगोले, सुरेश थोरात, विशाल दुधमल, अजय लहाडे यांच्यासह रमामाता महिला मंडळाच्या सुमनबाई जोंधळे, तुळसाबाई शिराढोणकर, गयाबाई हाटकर, गिरजाबाई नवघडे, भिमाबाई हाटकर, शोभाबाई गोडबोले, पंचफुलाबाई कोकरे, रेणुकाबाई गजभारे, सखुबाई हिंगोले, महामाया येवले, शेषाबाई धुळे, पद्मिनीबाई गोडबोले, निर्मलाबाई पंडित, रेखाबाई हिंगोले, सविताबाई नांदेडकर, शिल्पा लोखंडे, सुमनबाई वाघमारे, नानाबाई निखाते, भागीरथाबाई थोरात, वच्छलाबाई लहाडे, धमाबाई नरवाडे, आशाबाई हाटकर, विमलबाई हाटकर, प्रियंका लोखंडे, लक्ष्मीबाई गोडबोले, रेखा शेळके, सत्वशीला खिल्लारे, लक्ष्मीबाई खाडे, रणवीरबाई, आशाबाई राजभोज, गयाबाई नरवाडे, ज्योतीताई हिंगोले, संगीता थोरात, करुणाबाई गायकवाड, रमाबाई सातोरे, हटकर बाई, गिरजाबाई खिल्लारे, पंचशीलाबाई हाटकर यांनी परिश्रम घेतले.
चलनी नोटांच्या माल्यार्पणाने स्वागत
प्रज्ञा करुणा विहारात धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रेच्या निमित्ताने धम्म रॅली, भोजनदान, गाथापठण, धम्मदेसना, आर्थिक दान असे कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान, रमामाता महिला मंडळाच्या वतीने भदंत पंय्याबोधी थेरो यांना चलनी नोटांचा हार दानस्वरूपात भेट देण्यात देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपासकांकडून भिक्खू संघाने बावीस प्रतिज्ञा वदवून घेतल्या. अंधश्रद्धेला मूठमाती दिली पाहिजे. सत्याचा मार्ग स्विकारला पाहिजे. सर्वांनी बौद्ध धम्माच्या शिकवणूकीप्रमाणे वागले पाहिजे असे भदंत पंय्याबोधी थेरो यावेळी म्हणाले.