जि.प. शाळेचे शिक्षक चंद्रकांत लामदाडे यांनी जलतरण स्पर्धेत मिळविली ४ पदके -NNL


नांदेड|
महाराष्ट्र स्टे व्हेटेरन्स अॅक्वाटिक असोसिएशन या संस्थेतर्फे ८ व ९ ऑक्टोबरला २३ वी राज्यस्तरीय मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील २५ ते ८० व त्याहून जास्त वयोगटातील स्त्री-पुरुष जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत जि.प.प्रा.शा.बेटसांगवी-१  येथील आदर्श शिक्षक व उत्कृष्ट जलतरणपटू चंद्रकांत व्यंकटराव लामदाडे यांनी ४ पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले.  

महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स अक्वॅटिक असोसिएशन आणि गोदावरी मास्टर अक्वॅटिक असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक ८ व ९ आक्टोबर २०२२ ला नांदेड येथील कै शांताराम सांगणे जलतरणिका जिल्हा स्टेडियम जवळ गोकुल नगर नांदेड येथे आयोजित केली होती. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील 400 जलतरणपटू सहभागी झाले. लोहा तालुक्यातील बेटसांगवी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक चंद्रकांत लामदाडे यांनी १००मीटर ब्रेस्ट मध्ये सुवर्ण पदक, ५० मीटर ब्रेस्ट मध्ये सुवर्ण पदक , ४०० मीटर फ्री मध्ये रौप्य पदक  तसेच ५० मीटर बटरफ्लाय मध्येही रौप्य पदक याप्रमाणे २ गोल्ड व २ सिल्व्हर मेडल मिळवले.

त्यांच्या यशाचे गमक म्हणजे  संततधार पावसातही नियमितपणे गोदावरी नदीत पोहण्याचा सराव करतात. याच सरावादरम्यान त्यांनी कित्येक बुडणार्‍यांचे प्राण वाचविले तसेच पोलिसांना शव काढण्यात मदतही केली. आदर्श शिक्षकाबरोबरच एक उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून एका स्पर्धेत ४ मेडल घेऊन मिळवलेले यश तरुणांसाठी व जलतरणपटूंसाठी निश्चितच प्रेरणादायी व आदर्शवत आहे. असे मत लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के साहेब व शि.वि.अधिकारी श्रीमती आंबलवाड मॅडम यांनी व्यक्त केले.या यशाबद्दल  शेवडी केंद्राचे केंद्रप्रमुख नागोराव जाधव तसेच शाळेचे मु.अ. विजय राणे, उद्धव मुळे, शिवचंद्र कोडगिरे, गणेश बिजलगावे, मालू जाधव ,भुरे सर,केंद्रे मॅडम यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी