ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील विद्यार्थ्यांनी मिळवली एकूण पाच पारितोषिके -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रचेतना-२०२२’ युवक महोत्सवामध्ये एकूण पाच पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सुगम गायन -प्रथम, लावणी - प्रथम, शास्त्रीय तालवाद्य- द्वितीय, लोकसंगीत-तृतीय व शास्त्रीय सुरवाद्य - तृतीय अशी पारितोषिके विद्यार्थ्यांनी मिळवली. 

सुगम गायन या कला प्रकारामध्ये निवेदिता घोडेकर, लावणी या कलाप्रकारामध्ये श्रद्धा कांबळे, शास्त्रीय तालवाद्य या कलाप्रकारामध्ये मुंजाजी शिंदे, लोकसंगीत या कलाप्रकारामध्ये समाधान राऊत, अंकुश डाखोरे, ओंकार गायकवाड, मुंजाजी शिंदे, गजानन गोंधळी, गणेश महाजन, आशुतोष पाटील, प्रशांत चित्ते, लक्ष्मण सेनेवाड व शास्त्रीय सुरवाद्य या कला प्रकारामध्ये कृष्णा शिनगारे या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. 

संकुलातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम रित्या सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. कव्वाली, लोकनृत्य आणि एकांकिका, माइम व ललित कला स्पर्धेस रसिकांनी विशेष दाद दिली. या सर्व कलाप्रकारांची तयारी करून घेण्यासाठी संगीत विभागाचे प्रा. डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत प्रा. प्रशांत बोंपीलवार प्रा. नामदेव बोंपीलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यापीठ परिसर संघाचे प्रभारी डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांच्या नेतृत्वाखाली या सर्व कला प्रकारांचे सादरीकरण झाले.  संघप्रमुख  डॉ. शिवराज शिंदे व प्रा. वैशाली शेळके यांनी मार्गदर्शन केले. 

ललित व प्रयोगजिवी कला संकुलातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बीसेन, कुलसचिव सर्जेराव शिंदे. ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी