नविन नांदेड। सिडको हडको परिसरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक दुर्गादेवीचे विसर्जन ८आक्टोबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये भव्य मिरवणूक व्दारे विसर्जन स्थळी मनपाच्या वतीने झरी खदानीत क्रेन चा साह्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व मनपाचे सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांच्या सह कर्मचारी बंदोबस्त ठिकाणी ऊपसिथीत होते.
सिडको हडको परिसरातील अनेक भागात विविध सार्वजनिक नवदुर्गा महोत्सव मंडळाने विधीवत पूजन करून नवदुर्गा मुर्तीच्या स्थापन केली होती, ८आक्टोबर रोजी नवयुवक दुर्गा महोत्सव सिडको, वैभव दुर्गामंडळ गोविंद गार्डन हडको ,जय भवानी दुर्गा महोत्सव वाघाळा, ओंकार दुर्गा महोत्सव हडको, स्वामी विवेकानंद दुर्गा महोत्सव, हडको,अयोध्या नवदुर्गा महोत्सव, नृसिंह दुर्गा महोत्सव ज्ञानेशवर नगर ,एकता विसावा दुर्गा महोत्सव संभाजी चौक सिडको,यांच्या सह परिसरातील अनेक दुर्गादेवी मंडळाने विधीवत पूजन करून मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत जय माता दी, घोषणा देण्यात आल्या.या वेळी महिला ,युवक यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील शहरी १७ व ग्रामीण २ दुर्गादेवीचे विसर्जन रात्री फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोल ताशाचा गजरात मध्ये व भव्य मिरवणूकीने दुर्गादेवी चे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी नवयुवक दुर्गा माता महोत्सव मंडळ संत नरहरी महाराज मंदिर सिडको यांनी नांदेड येथील महाकाल ढोल ताशा पथकाने सादरीकरण केले यात युवती सह युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती तर महिला भक्त फेटे बांधून सहभागी झालेल्या होत्या.
दुर्गादेवी विसर्जन निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन ने पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली नऊअधिकारी व ६३ पोलीस अंमलदार, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त मिरवणूक मार्गावर व झरी खदान परिसरात ठेवला होता, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात,गुन्हे शोध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आंंनद बिचेवार,माणिक हंबर्डे महेश कोरे, बालाजी नरवटे, यांच्या सह पोलीस अंमलदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
मनपाचे सिडको सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन व बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी बाबरे, कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांच्या सह कर निरीक्षक सुधीर बैस दिपक पाटील व वसुली लिपीक यांच्यी नियुक्ती विसर्जन ठिकाणी करण्यात आली होती,मनपाने निर्माल्य गोळा सह बरिकेट लावुन खदानी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त सह कर्मचारी ठेवले होते.