शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरते गोठवले -NNL


मुंबई।
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले आहे. यासंदर्भातला अंतरिम आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री दिला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक तसेच याप्रकरणी अंतिम आदेश येईपर्यंत हा आदेश कायम राहील असेही आयोगाने म्हंटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. 

गेल्या चार महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोघांमध्ये खरी शिवसेना माझी यावरून वाद सुरू आहे हा वाद न्यायालयाच्या दरबारात पोहोचल्याने याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा असे सुचित केले होते त्यावरून आज रात्री मुंबई अंधेरी येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवले असल्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. 

या दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि निवडणूक चिन्हांचे प्राधान्यक्रम सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. अंधेरी निवडणुकीत ठाकरे गट आधि शिंदे गट अशा नावाने निवडणूक लढवावी लागेल, अशी माहिती समोर येत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या वतीने अनिल देसाई यांनी 25 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची माहिती आयोगाला दिली. ‘शिवसेना किंवा बाळासाहेब’ या नावांचा वापर करून कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्यावर त्यांनी अगोदरच आक्षेप घेतला होता.

उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर अनिल देसाई यांच्या दिनांक 01.07.2022 च्या ईमेलमध्ये 30.06.2022 रोजी जारी करण्यात आलेली 3 पत्रे जोडली होती, ज्यामध्ये पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या चार सदस्यांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवसेनेतील नेत्याची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत यांचा समावेश होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी