नविन नांदेड। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २७ आक्टोबंर रोजी सायंकाळी सहा वाजता हडको पाण्याचा टाकीजवळ ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन आयोजक सतिश पाटील बसवदे जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड शहर यांनी केले आहे.
आयोजक तथा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश बसवदे यांच्या मार्फत युवा गुप्रचा माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक ऊपकम आयोजन करण्यात आले होते या मध्ये शिवजयंती निमित्ताने शिवाजी अंडरग्राऊंड ईन भिमनगर मोहल्ला, नितीन बानगुडे पाटील यांच्ये व्याख्यान,हभप बाळु महाराज गिरगावकर, विजय महाराज तनपुरे यांच्या पोवाडा, संभाजी भगत यांच्या शाहीरी जलसा,जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्ये व्याख्यान,तर महिलांसाठी होम मिनिस्टर ,शिवलीला ताई पाटील यांच्ये किर्तन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कडुबाई खरात यांच्या भिम गिताचा तर अण्णा भाऊ साठे जयंती सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते, हे ऊपकम सामाजिक बांधिलकी जोपासली तर स्वच्छ व सुंदर सिडको कल्पनेतून कचरा पेट्या चे वाटप करण्यात आले, अन्नदान व शैक्षणिक क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यावर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २७ आक्टोबंर रोजी सायंकाळी सहा वाजता हभप इंदुरकर यांच्या किर्तन कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता ताई चव्हाण,माजी पालकमंत्री डि.पी.सावंत, आ.अमर राजुरकर, आ.मोहनराव हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्ये जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे पक्ष पक्षप्रवकते संतोष पांडागळे,जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोढेकर, विठ्ठल पावडे, राजु काळे,उदय देशमुख, श्रीनिवास जाधव, सिध्दार्थ गायकवाड,संजय मोरे, यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यी उपस्थिती राहणार आहे. या किर्तन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.