काँग्रेस सोशल मीडीयासाठी दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न -NNL


नांदेड।
येथे काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सोशल मीडीयासाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सोशल मीडीयाचे आधारस्तंभ व आमच्या आदरणीय ताईसाहेब श्रीजयाताई अशोकरावजी चव्हाण, आदरणीय बिल्लालभाई अहेमद स्टेट कोऑरडीनेटर महाराष्ट्र सोशल मीडीया यांची उपस्थिती होती.

 आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबाचे "भारत जोडो "यात्रेनिमित मोलाचे मार्गदर्शन व सर्व सोशल मीडीया प्रदेश,नांदेड शहर व नांदेड जिल्हाच्या पदाधिकार्यांना दिवाळीच्या शुभेच्छा व उत्तम फराळाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी बोलताना आदरणीय साहेबांनी सोशल मीडीयाच्या कार्याची प्रशंसा केली व कार्य उत्तम करण्यासाठी सोशल मीडीयाच्या स्टेट कोऑरडीनेटर बिल्लालभाई अहेमद यांना सोशल मीडीयासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले.


यावेळी उपस्थित असलेल्या प्रदेश, नांदेड शहर व नांदेड जिल्हाच्या पदाधिकार्यांचे बैठकीचे आयोजक साहेबांचे विश्वासु अभिजित देशमुख व काँग्रेस सोशल मीडीया विभागाचे शहरजिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू शहर जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सुखानंद पुरी यांनी आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी