नांदेड| मराठवाड्याचे भाग्यविधाते तथा नांदेडचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. या केंद्राच्या इमारतीचे बांधकामही प्रगतीपथावर आहे. या केंद्राचे काम सुरू करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या समन्वय पदी भूशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अर्जुन भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या विचार आणि कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. असा प्रमुख उद्देश या अध्यासन केंद्राचा आहे. या केंद्राचे काम सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती गठीत करण्यात आलेली आहे. या मध्ये डॉ. अर्जुन भोसले यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर डॉ. प्रभाकर जाधव, डॉ. विकास सुकाळे, डॉ. शिवराज बोकडे, डॉ. नारायण कांबळे, डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची समितीच्या सदस्य पदी नामनिर्देशित करण्यात आले आहे. या समितीची पहिली बैठक कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दि.२१ ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी या केंद्राला गतिमान करण्याचा सूचना कुलगुरू महोदयांनी सल्लागार समितीला दिलेल्या आहेत.
दीपावलीनिमित्त ‘स्वारातीम’ विद्यापीठास चार दिवस सुटी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास दीपावली सणानिमित्त दि.२४ ते २७ ऑक्टोबर-२०२२ दरम्यान चार दिवस सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. या सुट्या विद्यापीठाचे उपपरिसर लातूर, परभणी, हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज तसेच किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट यांनाही जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या दरम्यान विद्यापीठाचे सर्व कामकाज बंद राहणार आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.