अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आता हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त नव्या रब्बी हंगामावर -NNL

रब्बी हंगाम हुकला तर शेतकरी खचला अशी स्थिती सध्याची आहे


हिमायतनगर/पाळसपूर, कल्याण पाटील।
हिमायतनगर तालुक्‍यात प्रारंभी पाऊस मेहेरबान राहिला. नंतर मात्र त्याने रौद्ररूपच धारण केले. प्रारंभी सततच्या पावसाने उसंत मिळू दिली नाही. नंतर परतीच्या पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता पावसाचे हे घाव विसरून कशीबशी पैशाची तजवीज करीत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.  

शेतातील तण मोठ्या प्रमाणात आहेत ति कापणी करून किंवा तणनाशक फवारणी घेवून शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू आहे. खरीप हंगाम तोट्यातील ठरल्याने आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामावर सर्व भिस्त आहे. 

पावसाने केला खरीप पिकाचा घात  दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांनी खासगी कर्ज काढून, उसनवारी करून खरीप हंगामात पेरणी, लागवड केली. मात्र यंदा बहरलेल्या खरीप पिकाचा घास पावसामुळे हिरावला गेला. खरीप पिके हातची गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अगदी लावलेला खर्चदेखील वसूल झाला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था आणखी बिकट झाली आहे. 

रब्बीसाठी शेतीची मशागत हिमायतनगर परिसरात गेले काही दिवस पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय ऊनदेखील चांगले तापत आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेत तयार करणे सुरू आहे. शेतशिवारांत सध्या रब्बी पिके लागवडीची तयारी सुरू आहे. सकाळपासूनच शेतकरी शेतात कष्ट घेताना दिसत आहेत. रब्बीसाठी शेत मोकळे करण्यासाठी शेतकरी  सोयाबीन मळणी यंत्राने काढणी करण्यावर भर देत आहेत. हरभरा, गहू सोयाबीन लागवडीकडे कल  सततचा पाऊस झाल्याने परिसरात पाणी उपलब्ध झालेले आहे. 

सिंचनाची चांगली सोय असल्याने परिसरात हरभरा, गहू लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. शिवाय काही शेतकरी  हरभरा, सोयाबीन , गहू घेण्याची तयारी करीत आहेत. पैशांची तजवीज करताना दमछाक  खरीप पिके हातची गेल्याने, तसेच गेल्यावर्षीही हाती काहीच लागले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे नातेवाईक यांच्याकडून उसने पासने पैसे आणून, रब्बीचे बी-बियाणे उधारीवर आणून ताळमेळ केला आहे. 

पीकविम्याचे पैसे, शासनाची नुकसानभरपाई रब्बी पिकाच्या तोंडावर मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर पैशाची टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे सोयाबीन चे भाव गडगडले आहेत कापुस वेचणीस आला नाही त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीचे अनुदान व पिक विमा नुकसान भरपाई द्यावी कारण शेतकऱ्यांची दिपावली गोड होईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी