राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्यावतीने ग्रा.पं.कर्मचार्‍यांचे आंदोलन -NNL


नांदेड|
अभय यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करा आणि त्यानुसार ग्रा.पं. कर्मचार्‍यांना नगरपरिषद कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी सहीत अन्य वेतन विषयक लाभ द्यावा, 10 ऑगस्ट 2020 रोजी मान्य केलेले वाढीव किमान वेतन मार्च 2018 पासून लागू करा. त्याच्या फरकाची 57 महिन्यांची थकबाकी तात्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर आयटक प्रणित नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्यावतीने  तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) ने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्यात सहभागी नोंदवत नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्यावतीने सोमवार दि.3 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद,नांदेड समोर तीव्र धरणे निदर्शने आंदोलन केले. यावेळी पूर्वीच्या माजी ग्रामविकास मंत्री महोदयांनी उत्पन्न आणि वसूलीची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ती जाचक अट त्वरित रद्द करावी, कालबाह्य करणारा जाचक लोकसंख्येचा आकृतीबंध रद्द करा, 10 टक्के आरक्षणाची रेंगाळलेली भरती गतीमान करा.

ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचे जि.पी.एफ. ग्राम पंचायतचा हिस्सा व शासन हिस्सा कर्मचार्‍या खाती त्वरीत जमा करावी, सर्व कर्मचार्‍यांना पावती देण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांचा राहणीमान भत्ता 2007 पासूनचा जि.प. मार्फत ग्राम पंचायत निधीतून कर्मचार्‍याच्या खात्यात वर्ग करावा, ग्राम पंचायत तळणी, सेवक शिवराम मुंजाजी सुर्यवंशी यांचा 14 महिन्याचा पगार थकीत, सर्व ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना पगार पत्रक व ओळखपत्र त्वरीत देण्यात यावे, मरळक ग्रा.पं.चे कर्मचारी गणेश शिंदे यांच्या चौकशी अहवालाची प्रत देवून त्यांना त्वरित पूर्ववत कामावर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. 

या आंदोलनाचे नेतृत्व ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ.के. के. जांबकर, कॉ.शिवाजी फुलवळे यांनी केले. यावेळी कॉ. शिवाजी शेजूळे, कॉ. हर्षवर्धन आठवले, कॉ. देविदास कसबे, कॉ. रावसाहेब धोत्रे, कॉ. व्यंकटराव चिद्रावार, कॉ. यशवंत येवले,  कॉ. गणेश शिंदे, कॉ. माधवराव जनकवाडे, कॉ. लक्ष्मण आवळे, कॉ.माधव भिसे, कॉ.नागोराव पुयड, कॉ. एकनाथ गणगे, कॉ.परसराम पुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी