नांदेड| एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सोहळा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व जय जवान जय किसानचे प्रनेते तथा देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्रीजी जयंती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवाडा याचे संयुक्तिक सानिध्य साधून नांदेड येथील सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद नांदेडने वंदे मातरम रॅली(फेरी)चे दि.2/10/22 रोज रविवारी आयोजन केले होते. शहराच्या झोपड पट्टी व ग्रामिन भागातील गरजू ’ दुर्लक्षित,वंचित असे शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी व कामगार ज्येष्ठ’ महिला पुरूषांनी मोठीच गर्दी केली होती.
नांदेड जिल्ह्याचे खा.प्रतापरावजी पाटील चिखलिकर यांच्या हस्ते गरजूंना संधीवात, दमा, सर्दी खोकला, पित्त, कमजोरी, रक्तक्षय इ.आरांची औषधी सामाजिक कार्याची जाण व भाण असणार्या तथा दानशूर मेअर,लेबेन, एमट्रिट इ. कंपन्यांच्या सहायाने 370 रूग्नांना औषधी वाटप करण्यात आले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनांचेच औचित्त साधून ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्यांची निवेदनें देशाचे पंतप्रधान व खा.प्रतापरावजी पाटील चिखलीकरांना तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते इ.ना हजारोंच्या सह्या-अंगूट्या सह मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
इतर मागण्यासह प्रमूख मागण्याः 1) ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणण्यात यावे. 2)इतर राज्यांप्रमाणे गरजू, दुर्लक्षित व वंचित अशा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तथा कामगार ज्येष्ठ नागरिकांना 3500/-रू प्रतिमहा विना अट मानधन देण्यात यावे. 3) जगातील व भारत देशातील इतर राज्या प्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांची वयो मर्यादा साठ (60) वर्षच मान्य करून अंमलात आणावे व इतरही प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करून अंमलात आणाव्यात. नांदेड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालूक्यातून प्रमूख ज्येष्ठ नागरिक रॅलित सहभागी झाले होते.
नांदेड शहरातील पेन्शनर्स असोशिएनचे अध्यक्ष द.मा. रेड्डी, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघटणेचे मा.गिरिष सुभाषराव बार्हाळे, व्यंकटेश वुलबुले, कुंटुरकर, देगावकर डॉ.केसरी, अॅड.पवार माधवराव पवार काट कळंबेकर, प्रविण साले, दिपकसिंह रावत, सुशील चव्हाण, गंभीरे, अशोक धनेगावकर, डॉ शीतल भालके, सौ.वैशाली देशमुख, शत तारखा, महादेवी मठपती, सुष्मा ठाकूर, अनुराधा गिराम, सत्यभामा पांचाळ, लता उबाळे, कांचन ठाकूर अर्चणा चितळे, निलावती हिवराळे, संगनवार अनिता पाचंगे, पूनम कौर, लक्ष्मी वाघमारे अंगनवाडी सेविका व मदतणीस यांची विशेष उपस्थिती होती. रॅलीस खासदारसाहेबांनी हिरवी झंडी दाखविली.