भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी दत्ताभाऊ शेंबाळे यांची नियुक्ती -NNL


लोहा|
गेली अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रीय राहून पक्षवाढीसाठी व शेतकरी तसेच सर्व सामान्य जनतेसाठी, बेरोजगारांसाठी निष्ठेने काम करणारे  'दै. वतनवाला' चे कार्यकारी संपादक दत्ता भाऊ शेंबाळे यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतेच शिरूर जिल्हा पुणे येथे त्यांना पिंपरी चिंचवडचे भाजपाचे नेते एकनाथ दादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आल्याने एका सच्चा कार्यकर्त्यास न्याय मिळाल्यामुळे राज्यभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.      

दत्तात्रय तुळशीराम शेंबाळे यांनी सतत शेतकऱ्यांच्या मग तो शेतकरी अल्पभूधारक असो की ऊस उत्पादक असो त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध सतत रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. बेरोजगारांसाठी त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. तसेच विविध शासकीय खात्यांमध्ये झालेल्या भ्रष्ट व्यवहारांची कैफियत शासनदरबारी मांडले, तिथेही न्याय मिळत नसेल तर सनदशीर मार्गाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले व भ्रष्टाचारी अधिका-यांचा कायदेशीर इलाज केला.

दत्ताभाऊ म्हणजे माणुसकीचे प्रतीक आहेत. प्रसंगी जेवढे कनवाळू व्यक्तिमत्त्व आहे तेवढेच कर्तव्य कठोर भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय अत्यंत संयमी, प्रगल्भ अशी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक जाणीव असलेले हे दत्ताभाऊ हे जिल्ह्याचेच काय? राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठीचेदीन दलित, पददलितांच्या सर्वांगीण विकासाचे योग्य नियोजन करू शकतात. त्यांच्यातला हा गुण  हेरूनच चाणाक्षपणे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'दै वतनवाला' चे कार्यकारी संपादक दत्ताभाऊ शेंबाळे यांची वडगाव रासाई ता शिरूर जिल्हा पुणे येथे एका भव्य दिव्य कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ दादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण दादा कंद, ॲड. धर्मेद्र खांडरे सरचिटणीस संघटन भाजपा पुणे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.           

दत्ता भाऊ शेंबाळे यांच्या नियुक्तीबद्दल भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी चिंचवड मनपा चे गटनेते एकनाथ दादा पवार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच राजकुमार स्वामी फुळवळकर माजी सरपंच, फुळवळ, प्रकाश चव्हाण,शरद चव्हाण यांच्यासह राज्यभरातून तसेच लोहा कंधार सह जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी