नांदेड/नायगाव। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे औराळा येथील किरण शंकर वाघमारे या इसमाने जाणीवपूर्वक विकास कामात अडथळा करण्याच्या उद्देशाने तक्रारी करून पदाधिकारी व ग्रामसेवकाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या व्यक्तीवर निर्बंध आणावे अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी दिली आहे.
इसम मागील अनेक वर्षापासून गावात होत असलेल्या विकास कामाच्या बाबतीत तक्रारी करून विकास कामे करण्यासाठी अडथळे निर्माण करत आहे त्यामुळे गावातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत. सदरील इसमाच्या तक्रारखोर वृतीमुळे मोजे औराळा या ठिकाणी कोणतेही अधिकारी व कर्मचारी कार्य करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी सदरील इसमाविरुद्ध जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाही करून त्यांच्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी मौजे औराळा गावातील सुजाण नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर सतीश वाघमारे, साईनाथ पांढरे, गौतम वाघमारे, विठ्ठल गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, किसन सोनकांबळे, जनार्दन विश्वनाथ इंटिसवार, आकाश उत्तम सोनकांबळे, साईनाथ गंगाधर पांढरे, सतिस नारायण वाघमारे यांच्यासह गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. हे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने देण्यात आले आहे.