हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरातील एसटी बस्थानकांची अत्यंत दयनिय अवस्थेत असुन, याकडे कोणत्याही राजकीय नेते ढुंकूणही पाहत नसल्याने बस्थानकाची दुरावस्था पाहुन तालुक्यातिल प्रवासी माञ संताप व्यक्त करतांना दिसुन येत आहेत.
या बस्थानकात तालुक्यातील सर्वसामन्य प्रवाशी इतर गावासाठी जाण्या -येण्याकरिता येतात. मात्र जिल्ह्यातील मोठा तालुका आणि सर्वाधिक पदावर असलेल्या नेत्यांचे गावाचे बस्थानकाची हि दुरावस्था शरमेने मन खाली घालविणारी झाली आहे. येथे उतरणाऱ्या प्रवाश्याना चक्क नाकाला रुमाल लावुन थांबव लागत आहे. या बाबतीत माञ कोणत्याही राजकीय पुढा-याने बस्थानकाच्या सुविधे बाबतीत एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-याकडे साधा चुटकोरा कागदा सुध्दा लिहून पाठविलालेला नाही. त्यामुळे हदगाव शहरांच्या विकासाचे भकास चित्र येथे पाहावयास मिळते आहे. आणखीन विशेष म्हणजे थोडा जरी पाऊस पडला तरी बस्थानकात सर्वत्र चिखल होत आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने गेलेलं बरे म्हणून प्रवाशी महामंडळाच्या गाड्याकडे पाठ फिरवीत आहेत.
येथे झालेल्या चिखलातून प्रवांशाना बसमध्ये बसाव आणि उतरावं लागत आहे. या बाबतीत आगार प्रमुख सोनाळे यांना नांदेड न्यूज लाईव्हच्या प्रतिनिधीने भेट घेऊन विचारपूस केली आसता या बाबतीत आमच्या वरिष्ठांना बस्थानक व डेपोमध्ये पाणी साचलेले असते याची माहिती दिली आहे. तरीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने बस्थनकात मुरुम टाकल्याचे सागितले आहे. गाड्या दुरुस्ती करिता आमच्या मेकानिक यांना चिखलात काम कराव लागत अशी 'व्यथा' आगार प्रमुख यांनी सागितले.