नांदेड| सध्या नांदेड जिल्हयामध्ये गणेशउत्सव सण हा मोठया प्रमाणात साजरा होत असुन, सदर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना घडु नये त्याकरीता प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर यांनी सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगांराच्या याद्या अद्यावत करुन त्यांचेविरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही करणे, अवैद्य धंदयाविरुध्द केसेस करणेबाबत सुचना देऊन गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचा अनुषंगाने पेट्रोलिंग करताना गावठी पिस्टलसह (अग्नीशस्त्र) असलेल्या एकास वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या सुचनांचे अनुषंगाने पो.नि. जगदीश भंडरवार व पो.नि. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सक्त आदेश देऊन पो.रेढ हद्दीत कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना घडणार नाही याकरीता परीणामकारक पेट्रोलिंग करण्याचे आदेशीत केले. त्यानुसार दिनांक 02.09.2022 रोजी गुन्हे शोध पथकाचे संजय निलपत्रेवार, सपोनि, पोना/गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, पोकॉ/ संतोष बेलुरोड, शेख ईम्रान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम असे पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रेपलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, हरीष प्रकाश भगत रा. दिलीपसिंघ कॉलनी नांदेड या व्यक्तीकडे एक गावठी पिस्ल असुन तो सध्या गोवर्धनघाट जवळ असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.
त्यावरुन जेतवन बौध्द विहार गोवर्धनघाटया ठीकाणी छापा मारुन हरीष प्रकाश भगत यास पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक देशी लोखंडी गावठी पिस्ल ( अग्नीशस्त्र ) किंमती 25,000/- रुपयाचे मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतले. सदर प्रकरणी आरोपीने बिनापरवाना, बेकायदेशिररित्या गावठी शस्त्र बाळगले प्रकरणी संजय डी. निलपत्रेवार, सपोनि गुन्हे शोध पथक पो.रेढ वजीराबाद नांदेड यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा तपास प्रविण आगलावे, पोउपनि पो.ठाणे वजीराबाद नांदेड हे करीत आहेत. पोलीस ठाणे वजीराबाद येथील गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.