हिमायतनगर| सध्या सर्वंतर धार्मिक हिंदू सणांची रेलचेल सुरु आहे. या काळात विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी तर्फे महावितरण विभागाकडे करण्यात आली आहे.
राज्यात धार्मिक हिंदू सणांपैकी गणेश उत्सव, गौरी मातेची स्थापना, दुर्गाउत्सव असे सण लागोपाठ चालू राहणार आहेत. सध्या गणपती बाप्पाचा उत्सव धुमधडाक्यात चालू असून, अश्या काळात महावितरण विभागाकडून गेल्या दोन दिवस्पुसीन ऐन रेतीच्या वेळेला वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली असून, अशा पवित्र धार्मिक हिंदू सणांमध्ये दररोज सकाळी, संध्याकाळी नित्यनेमाने गणपती बाप्पा, मंगळागौरीच्यां मुर्तीसमोर आरती, भजन, कीर्तन प्रवचन, भागवत, रामायण, हरी विजय, गायनवादन, वाचन यासह इतर धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात.
मात्र अचानक विजपुरवठा महावितरण शहर कार्यालय हिमायतनगर कडुन वांरवार खंडित केला जात आहे. विद्युतपुरवठा कोणत्याही क्षणी रात्री - बेरात्री खंडित होत असुन, यामुळे गणेशभक्त व सामान्य नागरिकांना अडचण निर्माण होते आहे. विद्दुत पुअरवठा खंडित झाल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि बाब लक्षात सध्या गणेशोत्सव असल्याने असे विद्युत पुरवठ्यात खंडित होऊ नये. यासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग कार्यालय हिमायतनगरला भाजपाकडून निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण, जेष्ठ भाजप कार्यकर्ते कांतागुरु वाळके, युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याणसिंह ठाकुर, सेवा सो संचालक राम पाकलवाड, उपशहराध्यक्ष बालाजी ढोणे, सुभाष माने, अजय जाधव, लक्ष्मण चव्हाण, दुर्गेश मंडोजवार, वामनराव पाटील वडगावकर, अनिल माने, सचिन कोमावार, गंगाधर मिरजगावे सर, विनोद दुर्गेकर, ज्ञानेश्र्वर कोरडे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.