कॉमर्स मधील शिक्षणाचे फायदे …! कॉमर्स शिक्षणातील काही गैरसमजुती..NNL

उन्नती कॉमर्सचे संचालक प्रा. कृष्णा निलावार यांच्याशी या विषयावर केलेली खास बातचीत..!


प्रा. कृष्णा निलावार हे मागील दशकभरापेक्षा जास्त कालावधीपासून नांदेडात कॉमर्स संबधीच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत आपल्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याबरोबरच कॉमर्स क्षेत्रातील करीअर ची निवड कशी योग्य आहे हे उदाहरणासह सिद्ध करून दाखविले आहे..या बळावर आजच्या अतिशय स्पर्धेच्या काळातही त्यांच्या परिश्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांत कॉमर्स शाखेविषयी गोडी निर्माण झाली आहे व उन्नती कॉमर्स अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी हे कॉमर्स शाखेत देशपातळीवर आपले कतृत्व सिद्ध करत आहेत..

त्यांच्याशी कॉमर्स विषयाचे महत्व व गैरसमज या बाबतीत थेट बातचीत करण्यात आली त्यांचा सारांश .. कॉमर्स मध्ये शिक्षण घेत आहा त? आजही बऱ्याच वेळेला अनेक लोक मेडिकल आणि इंजिनिरिंग सारख्या क्षेत्रांची तुलना कॉमर्स क्षेत्राशी करतात आणि कॉमर्स क्षेत्राला कायम कमी समजतात. होय, हि आपल्या देशामधील एक दुर्देवी गोष्ट आहे, लोकांना असे वाटते कि ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिरिंग मध्ये प्रवेश मिळत नाही तेच विद्यार्थी कॉमर्स क्षेत्र निवडतात आणि आज आम्ही तुम्हाला कॉमर्स क्षेत्रामधील काही गैरसमजुती ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत त्या मुख्यतः खालील प्रमाणे आहेत.,,

ला तर मग पाहूया काय आहेत ह्या गैरसमजुती:

१.      अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थीच कॉमर्स चे शिक्षण घेतात

कॉमर्स क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढाच किंबहुना जास्त अभ्यास करावा लागतो जेवढा मेडिकल आणि इंजिनिरिंग मधल्या विद्यार्थ्यांना करावा लागतो कारण फायनान्स आणि इकॉनॉमी हि महत्वाची क्षेत्रे कॉमर्सशी निगडीत आहेत आणि हीच खरी परिस्थिती आहे कारण प्रत्येक क्षेत्रात अभ्यास आणि प्रात्यक्षिक गोष्टींचा अभाव असेल तर विद्यार्थी त्या क्षेत्रात पारंगत नाही होऊ शकणार.

२.      कॉमर्स क्षेत्राला एवढी काही मागणी नाही.

दुसरी चुकीची गैरसमजूत, कॉमर्स क्षेत्रामुळेच तर व्यापार आणि व्यवसाय क्षेत्र झपाट्याने पुढे चालले आहे. कॉमर्स क्षेत्रातील जाणकार व्यक्तीच फक्त व्यावसायिक बाबींमध्ये लक्ष घालून व्यवसाय सांभाळू शकतात. पैसा आणि इतर व्यवसायाशी निगडीत गोष्टींच्या व्यवस्थापनात कॉमर्स मधील जाणकार व्यक्ती कामास येतात जे इतर क्षेत्रातील व्यक्ती क्वचितच करू शकतात.

३.      CA, CS आणि ICWA सारखे कोर्सेस केले तरच कॉमर्सचा उपयोग होतो.

CA, CS आणि ICWA सारखे कोर्सेस केले म्हणजे उत्तम करियर घडते ह्यात काहीच शंका नाही पण हे कोर्सेस करत असताना यशाची हमी किती आहे ते बघणे जास्ती गरजेचे आहे. सर्वांनाच माहिती आहे कि ह्या कोर्सेस मध्ये प्रवेश घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांपैकी फक्त ५ ते ८ विद्यार्थीच फक्त उत्तमरीत्या हे कोर्सेस पूर्ण करू शकतात, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेस पूर्ण करण्यासाठी बराच वेळ आणि पैसा दोन्ही बऱ्याच प्रमाणात खर्च करावा लागतो. ह्या कोर्सेस शिवाय देखील कॉमर्स क्षेत्रात असे अनेक कोर्सेस आणि शिक्षणाच्या संधी आहेत ज्या तुम्हाला उत्तम करियर घडवण्यासाठी मदत करू शकतात.

कॉमर्स क्षेत्रामधील करियर म्हणजे एक उत्तम आणि आदर्श असे करियर आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे आणि उत्तम करियर संपादित करावे ह्यासाठी आम्ही उन्नती कॉमर्स अकॅडमी येथे अनेक उत्तम असे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आखले आहेत.

ह्या कोर्सेस मध्ये कॉमर्स मधील शिक्षण त्यांना कंटाळवाणे वाटत नाही उलट कॉमर्स मध्ये शिक्षण घेतोय ह्याचा अभिमान वाटतो कारण फक्त थेओरेटीकलच नव्हे तर जास्तीत जास्त प्रॅक्टिकल पद्धतीने आम्ही ह्या कोर्सेसची रचना केलेली आहे.ह्या कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेल्या नव-नवीन संधी आम्ही उपलब्ध करून देतो जसेकी इंटर्नशिप आणि ह्या गोष्टींशिवाय इंटरव्यूसाठी लागणाऱ्या उपयुक्त बाबी सुद्धा शिकवतो म्हणजे बॉडी-लँग्वेज कशी असावी, कॉर्पोरेट जगात वावरत असताना कश्या पद्धतीने कपडे परिधान करावेत तसेच अनेक साऱ्या बाबतीत आम्ही बारकाईने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोत..

 कॉमर्स शिक्षणातील व्यवसाय संधी..

जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर कार्यरत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी, वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उच्चस्तरीय व निम्न स्तरावरील रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत. कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे.

सामान्यत: वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा कल बी.कॉम. (पदवी) शिक्षणाशिवाय कंपनी सेक्रेटरी (सी.एस.), चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.), कॉस्ट अकाउंटंट (आय.सी.डब्ल्यू.ए.), कायदा (लॉ), स्पर्धा परीक्षा (यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.) या शिक्षणाकडे असतो; परंतु सध्या या दृष्टिकोनात मोठा बदल झाला असून, कॉमर्स विद्याशाखेकडेही उत्तम संधींच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आहेत. बहुव्यापक असणाऱ्या या शाखेतील विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असणारे मार्केटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, एच. आर., करिअर, अकाउंट्स, ऑडिट, बिझनेस टॅक्सेशन, कम्युनिकेशन, कॉस्टिंग या सर्व बाबींचा समावेश या बहुव्यापक शाखेत होत असल्याने सर्वसाधारण कारकीर्द करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. परिणामी, भावी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.

अधिक माहीती किंवा मार्गदर्शनासाठी संपर्क ..

प्रा. कृष्णा निलावार, संचालक, उन्नती कॉमर्स अकॅडमी, आनंद नगर, नांदेड!

9595948488, 9420848488 (लेखक सीएस म्हणून कार्यरत आहेत)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी