अर्धापूर। शुक्रवारी ३ दिवसांपूर्वी मामा त्याच्या मुलीशी लग्न लावून देत नसल्याने भाच्यानेच रात्री चोराच्या रुपात मामाच्या मानेवर, डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप पाच वार करुन मामाला ठार केल्याचा तपास मनाठा पोलिसांनी लावला असून,१९ वर्षीय भाच्याला अटक केली आहे.
नव्याने अर्धापूर तालुक्यात समावेश झालेल्या ९ सप्टेंबरला शुक्रवारी चाभरा येथील बालाजी दिगंबर काकडे वय (४०)यांना रात्री साडेअकरा वाजता कुऱ्हाडीने सपासप पाच वार करुन रक्ताचा सडा घटनास्थळी साचला होता,त्यात काकडे यांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला,३ दिवसांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या,मयत काकडे यांचा भाचा एकनाथ बंडू जाधव याने मामाच्या मुलीशी लग्न करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता.
पण एकनाथ बेरोजगार असल्याने मामा मयत काकडे यांनी या प्रस्तावास नकार देत विरोध केला, त्यामुळे मनात खुन्नस ठेवून मामालाच ९ सप्टेंबर च्या रात्री वरील घटनेत संपविल्याची पोलिस खाक्या पाहताच कबूली दिली, आरोपीला अटक केली, याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला,केवळ ३ दिवसांत पोलीसांनी तपास केला आहे.