आशाताई शिंदे यांचे वीज पडून मृत्यू पावलेल्याकुटुंबियांचे सांत्वन -NNL


लोहा|
तालुक्यातील रमणेवाडी,नागदरवाडी येथे सोमवारी वीज पडून संगुबाई तातेराव केंद्रे व पांडुरंग कंधारे यांचे निधन झाले. त्याच्या कुटुंबियांची शेकाप महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली व सांत्वन केले.   

आशाताई शिंदे यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची या प्रकरणाविषयी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून, तात्काळ दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगितले. केंद्रे व कंधारे कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे कटिबद्ध आहेत असेही त्यांनी सांगितले. माजी प स सदस्य .केशवराव तिडके, माळाकोळी सरपंच मोहन शुर, माजी सरपंच राजू पाटील कापसीकर, संतोष पा वळवळे, ग्रा धोंडीबा बोइनवाड, चंद्रकांत केंद्रे, हाडोळी सरपंच लक्ष्मण केंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव श्रीरामे सह कार्यकर्ते,गावकरी व केंद्रे व कंधारे परिवार उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी