इस्लापुर। किनवट तालुक्यातील शिवणी येथील जि.प.हायस्कूल येथे दि.१२ सप्टेंबर रोजी हायस्कूल चे मुख्याध्यापक जि.एस.गोपुवार यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्स्थापना करण्यात आले. या वेळी सर्व प्रथम आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले.
तर जि.प हायस्कूल च्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.या निवडीत मध्ये एकूण चार पुरुष चार महिला असे एकूण आठ व तज्ञ शिक्षक म्हणून एक ग्रामपंचायत चे एक असे एकूण दहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.या दहा सदस्यांनी अध्यक्षपदी भोजराज देशमुख तर उपाध्यक्षपदी सौ.दीपाताई चेपूरवार यांची बिनविरोध निवड करण्यात आले.या वेळी प्रमुख उपस्थिती शिवणी नगरीचे सरपंच सौ.लक्ष्मीबाई डुडुळे श्रीमती कमलबाई देशमुख,कें.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक बी.एल.चव्हाण, डी.ई.पांचाळ सर,माजी शालेय समितीचे अध्यक्ष संग्राम बिरकुरे,पत्रकार प्रकाश कार्लेवाड आदी होते.
जि.प.हायस्कूल चे नव्याने समिती निवड करतांना शासनाने नमूद केलेल्या सर्व नियमावलीच्या माध्यमातून ही निवड करण्यात आले.यात जि.प.हायस्कूल चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून भोजराज देशमुख व उपाध्यक्ष म्हणून सौ.दिपाताई चेपूरवार उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आले.तर सदस्य म्हणून सुनील पांडे, चीन्नना (बाबू) मुद्दलवाड, राजेश्वर गड्डमवाड, नागनाथ औनूरवार,सौ.कविता दांडेगावकर,सौ.राधिकाबाई पांडे,सौ.मयुरी मज्जरवाड, ग्रामपंचायत सदस्य संग्राम बिरकुरे,तज्ञ शिक्षक म्हणून डी.ई.पांचाळ असे एकूण दहा सदस्यांची ही समितीची निवड करण्यात आले.
यावेळी पालक शंकर घोगुरवाड,नरेश पालेलु,बंडू दांडेगावकर, लच्छीराम येइल वाड,ब्रम्हानंद राठोड,साईनाथ कार्लेवाड, गणेश मोहिते,गणेश कार्लेवाड,कोंडीबा बँकेवाड, गंगाचरन मज्जरवाड, अशोक आडे,भागोराव डुडूळे,ग्रा.पं सदस्य रामचंद्र खंडेलवाड, बाळू सोनारीकर,सुरेश जाधव,सह डी.एस.इंदुरकर, आर.जी.बोरगावे,कार्यक्रमाचे संचालन बी.एस.डहाळे तर आभार एम.आर गिरी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.हिना इनामदार सह आदींनी परिश्रम घेतले,तर उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष भोजराज देशमुख उपाध्यक्ष सौ.दिपाताई चेपूरवार सह सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तर भोजराज देशमुख यांनी मागील काळात शिवणीच्या जि.प.हायस्कूल ला शिक्षक मिळवून देण्यासाठी केलेले कार्य मोलाचे होते.तर या वेळी त्यांना समितीचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्यामुळे देशमुख यांचे सर्वत्र कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.