हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व तालुका परिसरातील गोवंश व इतर जनावरांच्या लसीकरणाचे काम शासनाच्या आदेशाने हाती घेऊन अवघ्या काही दिवसात लसीकरणाला गती दिल्यामुळे आज घडीला लसीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आजही चार ठिकाणी लसीकरण सुरु असून, आज हे काम पूर्ण होईल अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश सोनटक्के यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यात केवळ एकाच गोवंश कारंजी येथे लॅम्पईग्रस्त आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाणायचे कारण नाही. त्या गोवंशावर उपचार सुरु असून, ते गोवंश उपचाराला प्रतिसाद देत आहे. तालुक्यात एकूण जनावरांची संख्या १६ हजार जनावरांच्या लसीकरचे उद्देश दिलेले आहे. प्राप्त झालेली १५ हजार २०० मिळाली १५ हजार १०० लसीकरण करण्यात, वेस्टेजमध्ये १०० गेले, यात गाई १० हजार ६९७ आणि बैल ४ हजार ४०३ असे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे ९९.९ गोवंशाचे लसीकरण पूर्ण झाले झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण राहिले त्यांनी रुग्णालयास संपर्क करावा. कुण्या जवणाराना गुठळी किंवा अंगावर गाठी दिसल्यास शासकीय पशु अधिकारी याना संपर्क करून उपचार करून घ्यावा. खाजगी व्यक्तीकडून उपचार करून घेऊ नाही. उपचारादरम्यान गोवंशाचे नुकसान झाले तर मिळणाऱ्या अनुदानासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून उपचार करून घेतल्यास त्याचा रिपोर्ट शासकडे जाईल त्यामुळे पशुपालकणी जनावरांचा उपचार करून घेतला काळजी घायवी असे आवाहन त्यांनी केले आहे.