हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील गाभार्यात असलेली फरशी खराब झाल्यानंतर मंदिर समितीने गाभार्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंदिरातील नुतणीकरण जोपर्यंत भाविकांना दर्शनाची अडचण होऊ नये म्हणून बाजूला असलेल्या शिवपती मंदिराच्या भिंतीजवळील खिडकीतून श्री परमेश्वराचे मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
नूतनीकरणामुळे मंदिराच्या गाभार्याच्या सौंदरीकरणात भर पडणार असून, आकर्षक फारशी आणि भिंतीचीही दुरुस्ती यात केली जात आहे, तसेच मंदिराच्या मूर्तीच्या बाजूला असलेल्या कमानीला देखील सुशोभित केले जाणार असल्याची माहिती मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. सदरील काम सुरु असेपर्यंत भाविकांना दर्शनाची अडचण होणार नाही याची काळजी घेण्यात अली असून, आतमधील काम सुरु असल्याने भाविकांनी शिवपती मंदिराच्या बाजूला असलेल्या पूर्वाभिमुख खिडकीतून श्री परमेश्वराचे मुख दर्शन घावे असे आवाहन करण्यात आले आहे.