हिमायतनगर| येथील पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के यांनी एका गोमातेला जीवदान दिले आहे. याचे झाले असे कि, तालुक्यातील रमनवाडी तांडा येथील एका गाईच्या पोटातली अभ्रक मरण पावले होते, हे समजताच रात्री ९ वाजता त्यांनी गाव गाठून गाईचे ऑपरेशन करून मृत वासरू बाहेर काढत गाईला जीवदान दिले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमणवाडी येथील शेतकरी बळिराम विठोबा जाधव यांच्या गाईचे पोटात वासरू मयत झाले. मात्र हे समजू शकले नसल्याने शेतकरी गाय कधी व्हते याची वाट पाहत होते. मात्र गाय वित्त नसल्याने त्यांनी याची माहिती डॉक्टर सोनटक्के याना कळविली. यावेळी डॉक्टरांनी रात्रीला रमनवाडी गावात हजार होऊन त्या गाईचे सिजर ऑपरेशन करून मयत वासरू बाहेर काढले. सदरील ऑपरेशनसाठी जवळ पास दोन तास लागले. यासाठी त्यांना डॉ. सतीश बलपेवाड व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. डॉक्टरांनी मृत वासरू बाहेर गढून गोमातेला जीवदान दिल्याबद्दल या गावातील सर्व नागरिकांनी डॉक्टर साहेबाचे आभार मानले आहे.