नांदेड। आमच्या लोकांचे भवितव्य असणारा भारताचा तिरंगा फडफडतो की, तडफडतो आहे .कागदावरच लोकशाही जिवंत ठेवणार की, तिचं रूपांतर सामाजिक, आर्थिक, लोकशाहीत आपण करणार आहोत. राजकारण बिघडलं म्हणून हात वर करणार की, सुधारलेल्या सुधारित वृत्तीच्या संस्काराच्या नव्या राजकारण्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया चार भिंतीच्या घरात, शाळेत चार भिंतीबाहेर समाजाच्या विद्यापीठात नव्या राजकारणाची पिढी घडवणार आहोत की नाही? घडवणार नसू तर मग तुमच्या आमच्या देशाचे भवितव्य चांगलं कसं असू शकेल असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.
दिवंगत गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव व टीचर्स क्लब रुग्णालय व स्व गंगाधरराव पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने नांदेड येथील कुसुम सभागृहात जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील शेळगावकर हे होते .
यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, जगातल्या कोटी कोटी लोकांच्या पोटात अन्नाचा घास नाही.सध्या जगभर दहशतीचे वातावरण आहे. रशियाचा हल्ला युक्रेनवर झाला आहे. चीनची मुस्कटदाबी तैवान सहन करतोय .अमेरिका महासत्ता रशिया चीनला भीती दाखवण्यासाठी हिंदी महासागरात वेगवेगळे प्रयोग करतो. देशामध्ये गांधीच्या मारेकऱ्याला देव बनवत आहेत .पुढच्या पिढीला कोणते महात्मा गांधी आपण सांगणार आहोत .शिकवणार आहोत .अहिंसेचा जप करणारा महात्मा गांधी लोकशाही स्वातंत्र्यानंतर दररोज मारल्या जात आहे .आणि गोडसेचे समर्थन वाढत आहे ही चिंतनीय बाब आहे .
समाजिक,राजकारणात धर्मकारणात विशिष्ट प्रकारचे बळ घेऊन उभे आहोत. माणसाच्या मानवतावादी भूमिकेला न्याय देण्यासाठी अपूर्णतेला न्याय देण्यासाठी निर्माण झालेला धर्म शुद्ध स्वरूपात राहिला आहे काय, याचे चिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. टीचर क्लब रुग्णालय सेवाभावी संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथे जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्याच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे माजी अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विक्रम काळे, नगरसेवक संजय पांपटवार, संयोजक गजानन पांपटवार डॉक्टर राम वाघमारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा माजी खासदार भाई केशवराव धोंडगे, साहित्य क्षेत्रातील भू.द. वाडीकर, शासकीय क्षेत्रात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, सामाजिक क्षेत्रात आर्य वैश्य महासभा महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, आरोग्य विभागातून पोट विकार तज्ञ डॉ. नितीन जोशी, पत्रकार क्षेत्रातील अनिल कसबे यांना जीवन गौरव पुरस्कार तर प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल रवी लोहाळे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून प्रा. डी.बी. जांभरुणकर निवड समितीचे अध्यक्ष डॉ राम वाघमारे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली पाम्पटवार, बालाजी पाम्पटवार, नामदेव चव्हाण, सूर्यकांत गायकवाड, अनिल वट्टमवार, सूर्यकांत कावळे, विजय चालकवार, संगमेश्वर कानगुले, गणेश भोसले, डॉ. राम वाघमारे, डॉ. किरण मंडले, डॉ. मानसी इंदुरकर, डॉ. पल्लवी सातभाई, डॉ. सविता पाटील डॉक्टर विश्वजीत पाटील, गोपाळराव पेंडकर, राजेश यादव, रंगनाथ कांबळे, कविता ढगे आदींनी परिश्रम घेतले.
माधवराव पाटील शेळगावकर यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले मतदारांनी पैसे घेऊन मतदान केल्यामुळे भारतीय लोकशाही खिळखळी झाली आहे ,असे सांगून आता लोकच सारी व्यवस्था बदलू शकतील अशा आशावादी त्यांनी व्यक्त केला