गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमास हिंगोलीत प्रतिसाद -NNL


नादेड।
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परंतू जंगल नष्ट करुन होणारा हा विकास कुणालाही परवडणारा नाही. हे खरे असले तरी, हल्ली गुळगुळीत रस्त्यांवरुन चालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे. त्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. आँक्सिजन पुरवणाऱ्या झाडांची लागवड होणे गरजेचे आहे. याच भावनेतून गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. 

गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या  वाढदिवसानिमित रविवारी (ता.११) हिंगोली येथे गोदावरी फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे हिंगोली जिल्हा समन्वयक शिवाजी पातळे, सोनल सुलभेवार, डॉ कांचन बागडिया, सुनीता मुळे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखा देवकते,  नयना पैठणकर,  सुनिता शृंगारे,  राखी झंवर, सुशीला आठवले,  सीमा पोले, गोदावरी अर्बन शाखेचे मॅनेजर प्रदीप देशपांडे,  जय देशमुख,  विशाल नाईक,  रंजना हरणे,  श्रुती कोंडेवार, विठ्ठल कावरखे, संदीप सोनटक्के,  श्री ससे,  श्री कान्हेड यांच्यासह उपस्थित मान्यवरानी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (गार्डन) परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून वृक्षसंवर्धानाचा संदेश दिला. सोबतच लावलेल्या झाडांचे यथा योग्य संगोपन करण्याची देखील प्रत्येक पर्यावरण प्रेमी व गोदावरी फाऊंडेशनच्या कर्मचारी यांनी शपथ घेतली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी