मुखेड, रणजित जामखेडकर| पोलीस स्टेशन मुखेड तर्फे सर्व नागरीकांना अहवान करण्यात येत आहे की , नांदेड जिल्हयामध्ये व पोलीस स्टेशन मुखेड हदीमध्ये चोर आले चोर आले तसेच लहान मुलांना टोळी फिरत आहे.
अशी अफवा सर्वत्र पसरवली जात आहे . तसेच आज रोजी पोलीस स्टेशन मुखेड हदीमध्ये अहिल्याबाई होळकर नगर येथे तिन इसमांना नागरीकांनी पकडुन पोलीसांचे हवाली केले होते . त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असुन सदरचे मुले हे भिक्षा मागण्यासाठी फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहेत . तरी सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावरील मॅसेज इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये.
तसेच आपणास कांही संशयास्पद व्यक्ती व त्याची संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलीस स्टेशन मुखेड येथे संपर्क साधावा व प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक ११२ , १०० नंबर वर फोन करून तात्काळ माहीती कळवावी. कोणत्याही नागरिकांचा संशय करून त्यांना पकडुन मारहाण करत कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये आवाहन मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी शहरासह तालुक्यातील नागरिकांना केले आहे.