वसरणी परिसरातील मोहन नगरी साठी २० लक्ष रुपयांचा निधी,आ.मोहनराव हंबर्डे -NNL


नविन नांदेड।
मोहन नगरी विकासासाठी २० लक्ष रुपयांचा निधीची घोषणा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी नामफलक अनावरण प्रसंगी केले.

लातूर फाटा परिसरातील वसरणी भागातील मोहन नगरी नाम फलकाचे अनावरण दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी करण्यात आले, यावेळी ऊधदाघाटक आमदार मोहनराव हंबर्डे यांनी या नगरीचा विकासासाठी २० लक्ष रुपयांचा निधी जाहीर करून ड्रेनेज लाईन व रस्ता साठी जाहीर केला.

लातूर फाटा नजिक असलेल्या मनपा  परिसरातील वसरणी भागातील गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वसाहत उभारली असून या ठिकाणी अनेक इमारती उभारल्या आहेत , जागेला मोहन नगरी असे नाव ठेवण्यात आल्या नंतर परिसरात नाम फलक अनावरण सोहळा आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य गंगाप्रसाद काकडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे,माजी सभापती श्रीनिवास बंडेवार,

माजी मनपा विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, माजी नगरसेवक प्रा.ललीता शिंदे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास मोरे, भि.ना.गायकवाड, सतिश बसवदे बसवदे, शेख अस्लम, शंकरराव धिरडीकर, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,या ऊपसिथीत मान्यवरांच्ये स्वागत अशोक शिवनगावकर, प्रेमचंद पौळ, अमोल धानोरकर, गिरी,अशोक लोंढे, कंदकुर्ते,दिलेराव,मुंढे,हाळदेकर, मंगेश मुळे,वंसतराव शिवनगावकर, कदम पाटील चिखलीकर ,विश्वास बंडेवार,राजु शिंदे,यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अशोक मोरे यांनी मोहन नगरी मध्ये ड्रेनेज लाईन व रस्ता करण्याची मागणी केली, तर सूत्रसंचालन दिंगा पाटील यांनी केले. गंगाधर भुते, अशोक मामा,शंकर मामा यांच्या सह परिसरातील नागरीक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी