अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील बहुचर्चित लहान येथील विविध कार्यकारी सह.सोसायटीच्या चेअरमनपदी काॅग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर व बालासाहेब देशमुख लहानकर यांच्या गटाचे माजी उपसरपंच सतिष देशमुख लहानकर यांची बिनविरोध चेअरमनपदी तर बालाजी पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली,या निवडीकडे तालुकावासीयांचे लक्ष वेधल्याने या निवडीला महत्व प्राप्त झाले होते.
अर्धापूर तालुक्यातील लहान येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या १२ जागासाठी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातही निवड लक्षवेधी ठरली होती,काॅग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर व माजी सरपंच बालासाहेब देशमुख लहानकर यांच्या नेतृत्वाखाली बारापैकी १० जागा बिनविरोध निवडून आणल्या,तर २ जागा विरोधी पॅनलच्या निवडून आल्या, मोठ्या गावात बिनविरोध निवडणूक झाल्याने प्रचार यंत्रणा राबविण्याचे दोन्ही गटाला गरजच पडली नाही, त्यामुळे १ सप्टेंबरला चेअरमन व व्हाॅईस चेअरमनपदाची निवड होती, त्यामुळे प्रत्यक्ष चेअरमनपदी कोणाची निवड होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते, संजय देशमुख लहानकर यांचे बंधू सतिष देशमुख लहानकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी बालाजी दतराम पाटील यांची निवड करण्यात आली.
या निवडणूकीत संजय लहानकर गटाचे वर्चस्व दिसून आले,यावेळी सभापती प्रतिनिधी अशोक सावंत, एल बी रणखांब, भिमराव देशमुख लहानकर,दतराव देशमुख लहानकर,गिरीष देशमुख,सुभाष लोणे, दतराव हारण डॉ.संजय कल्याणकर, प्रदीप देशमुख,आनंदराव राणेवाड,अशोक देशमुख लहानकर,बाबू बिचेवार, आनंदराव लोणे,प्रभाकर बादल,संचालक सुधीर देशमुख लहानकर, ए बी देशमुख,दिलीप लोणे,शेख हुसेन शेठ,कमलबाई दिगंबर लोणे,कमलबाई गाजेवार,कोंडीबा दळवी, शामराव काळे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.