नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील एम.आय.डि.सी. औधोगिक वसाहतातीतुन चोरीस गेलेला ३६ हजारांचा बारदाना जप्त करून न्यायालयाच्या आदेशानुसार मोहन भानुशाली यांना पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या ऊपसिथीत दि .११ जुंन रोजी परत करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुरंन 312/21 क379 भादवी मधील चोरी गेलेला माल बारदाना किंमत 36000रू फिर्यादी नामे मोहन जयराम भानुशाली यानी दिली होती. या प्रकरणी गोपनिय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी साहेबराव मुपडे यांनी सापळा रचला.
आणि औधोगिक वसाहातातील एका कारखान्यात हा चोरीस गेलेला मुद्देमाल विकण्याचा तयारीत असलेल्या दोन जणांना टेम्पोसह बारदाना जप्त करून अटक केली होती. जप्त केलेला बारदाना हा शहनिशा केल्यानंतर न्यायालयाचा आदेश नुसार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या ऊपसिथीत फिर्यादी मोहन भानुशाली यांना परत देण्यात आला.