नांदेड। आकाशवाणी नांदेड केंद्राचा दिनांक 29 मे रोजी 31 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त दिनांक 29 मे 2022 रोजी आकाशवाणी परिसरात सकाळी 10 वाजल्यापासून रक्तदान शिबिर व श्रोता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आकाशवाणी नांदेड केंद्राची स्थापना 29 मे 1991 रोजी झाली. आता 31 वर्षे पूर्ण होऊन 32 व्या वर्षात पदार्पण करत आहे. नांदेड आकाशवाणी केंद्रामुळे स्थानिक कलावंतांना मोठ्या प्रमाणामात संधी प्राप्त झाली आहे. लहान बालकांपासून ते वयोवृद्धांसाठी नांदेड आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रसारित करते. यात युवावणी, किसानवाणी, घरसंसार, लो
दिनांक 29 मे रोजी वसरणी, नांदेड येथे आकाशवाणी केंद्रात वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीर आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान शिबिर व श्रोता संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आकाशवाणीचे अभियांत्रिकी प्रमुख आनंद ढेंगे व कार्यक्रम अधिकारी तथा कार्यक्रम विभाग प्रमुख विश्वास वाघमारे, गणेश धोबे व प्रसारण अधिकारी राहुल अत्राम यांनी केले आहे.