विहिप बजरंग दल तर्फे गीता जयंती व हिन्दू शौर्य दिनानिमित्त महाआरतीचे आयोजन -NNL


नांदेड।
तिथी नुसार गीता जयंतीच्या मुहूर्तावर बाबरी ढाचा पाडण्यात आला. त्यामुळे विहिप बजरंग दल तर्फे गीता जयंती हिन्दू शोर्य दिनानिमित्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षी 3 डिसेंबर शनिवार रोजी सायं 6:30 वाजता पंचवटी हनुमान मंदिर जवळ, हनुमान पेठ येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरती ह्या कार्यक्रमात भजन सादरीकरण नांदेड शहरात प्रसिद्ध असलेले श्री संजीवनी भजन मंडळ करणार आहेत. ह्या कार्यकमाचा प्रचार प्रसार गेल्या 3 दिवसापासून अतिशय उत्साहाने सर्व रामभक्त करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्व तयारीत शुक्रवारी पंचवटी हनुमान मंदिर येथे भगवे ध्वज व पताके लावून भव्य भगवीकरण करण्यात आलेले आहे.

सामूहिक हनुमान चालिसा पठण व महाआरती ह्या कार्यक्रमात प्रत्येक हिन्दूनी एकत्र येऊन पुन्हा एकदा हिंदुत्वाचा बुलंद करावा अशे आवाहन विश्व हिन्दू परिषद व बजरंग दल तर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी