टेंभूर्णीवासीय संतप्त...

सीईओच्या कारनाम्याने टेंभूर्णीवासीय संतप्त... उपोषणाच्या तयारीत

नांदेड(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभूर्णी येथील शोष खड्ड्यांचा पैटर्न मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी नांदेड पैटर्न म्हणून आपल्या नावाने खपवून घेत असल्याच्या निंदनीय प्रकाराने टेंभूर्णी येथील गावकरी व सरपंचानी उपोषणाचा पावित्र घेतला आहे. नांदेड पैटर्न ऐवजी डासमुक्तीचा टेंभूर्णी पैटर्न असा नामोल्लेख करण्याचा आग्रह गावकर्यातून धरला जात आहे. 

सन २००४ -०५ साली टेंभूर्णी येथील अभियंता असलेले सरपंच यांच्या संकल्पनेतून संपूर्ण टेंभूर्णी गाव हागणदारी मुक्त व सांडपाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनातून शोष खड्ड्यांची निर्मित्ती करण्यात आली. आणि पाणी जमिनीत जिरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यांच्या कार्याची अनेक मान्यवरांनी व वर्तमान पात्रांनी दाखल घेतली. आणि ०४ में २००७ रोजी तत्कालीन दिवंगत राष्ट्रपती मा.डॉ.ई.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते आंबेडकर स्टेडीयम नवी दिल्ली येथे प्रमाणपत्र देवून प्रल्हाद पाटील व गावकर्यांच्या कार्याचे तोंडभर कौतुक करण्यात आले होते. 

कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता उच्च शिक्षित असलेल्या सरपंच प्रल्हाद पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण होणार्या शोषखड्ड्यांना गावकर्यानीही तितक्याच जोमाने प्रतिसाद दिला. आणि बघता बघता हि शोष खड्ड्यांची लोकचळवळ बनली. सारे टेंभूर्णी गाव अल्पावधीतच गटारमुक्त व पर्यायाने डासमुक्त झाले. प्रल्हाद पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि शोषखड्ड्यांचा वेलू गगनावरी गेला. टेंभूर्णीच्या डासमुक्तीच्या पैटर्न सुरुवातीला जिल्हाभर, महाराष्ट्रभर आणि आता संपूर्ण भारत देशात याची चर्चा होऊ लागली. हा पैटर्न देशभर राबविण्यात येऊ लागला, या प्रकल्पाची उत्तरोत्तर होणारी लोकप्रियता पाहता नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी सदरील पैटर्न हायजैक करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप टेंभूर्णीच्या गावकर्यामधून करण्यात येऊ लागला. गावकर्यांच्या मते आमच्या गावाचे नंदनवन करण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वखर्चातून हा प्रकल्प राबविला. परंतु शासनाने याची दाखल घेवूनही टेंभूर्णी वासीयांची कोणतीही मदत केली नाही. याउलट शोष खड्डयासाठी व शौच्चालय निर्मित्तीसाठी आर्थिक मदत केलेल्या गावांचा गवगवा करून आमच्याच संकल्पनेतून हा प्रकल्प साकारल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे सांगत असल्याने हे धांधात खोटे असल्याचे गावकरी सांगत आहेत. 

त्यांच्या अश्या टेंभूर्णी प्रकल्पाच्या पळवा - पळवी करण्याच्या प्रयत्नाने ग्रामस्थ संतप्त झाले असून, दि.१७ जानेवारी रोजी ग्रामसभा घेवून या विषयीचा ठराव घेण्यात आला. आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दि.१९ जानेवारी रोजी देवून नांदेड पैटर्न नाव बदलून डासमुक्तीचा टेंभूर्णी पैटर्न असा उल्लेख करावा अशी मागणी केली आहे. आगामी सात दिवसात याविषयी निर्णय न घेतल्यास गावकर्यासह सरपंच प्रल्हाद पाटील यांनी उपोषण करण्याचा इशारा दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शोषखड्ड्यांचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नामुळे वादाची ठिणगी उडाली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी