नांदेड/भोकर| अनैतिक संबंधातून ४५ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना भोकर- उमरी रस्त्यावर रविवारी दि.२४ एप्रिल च्या सायंकाळी घडली. शोभा सखाराम आडे वय ४५ वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. किनवट तालुक्यातील शिवणी येथील आरोपी सुरेश बळीराम आडे यास पोलिसांनी अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मौजे शिवणी ता.किनवट येथील शोभा सखाराम आडे वय ४५ वर्ष हिचे गावातील आरोपी सुरेश बळीराम आडे यांच्यात एक वर्षांपूर्वी अनैतिक संबध होते. शोभा व तिचा पती भोकरमध्ये कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी आले. शोभाचा पती एका हॉटेलमध्ये नोकर होता. दि.२४ रोजी दुपारी ४ वाजता आरोपीने शोभाला दुचाकीवर बसवून उमरी येथे आणले.
सागवान फाटा येथे एका पाणंद रस्त्यावरील नाल्यात नेऊन शोभाच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला व आरोपी तेलंगाणातील बेलगाम येथे पळून गेला. याबाबत सखाराम जगरूप आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक विकास पाटील हे फोजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली.
.jpg)