'स्वारातीम' विद्यापीठात सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या कार्यशाळेचे आयोजन -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘राष्ट्रचेतना-२०२२’ हा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव दि. ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीमध्ये ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड. येथे संपन्न होणार आहे. या युवक महोत्सवामध्ये एकूण २८ कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.  

त्यानुषंगाने आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात ज्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होते त्याची नियमावली तसेच संगीतकला, ललित कला, वाड्मय कला, लोकनृत्य व आदिवासी नृत्य, नाटक व एकांकिका तसेच प्रबोधनात्मक जलसा इ. कलाप्रकारांचे विद्यार्थी कलावंतांना परिपूर्ण ज्ञान व्हावे व त्यांना या महोत्सवात नियोजित वेळेत अचूक सादरीकरण करता यावे, यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व महाविद्यालयांच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

या कार्यशाळेत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक/साधन व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या विविध कलाप्रकारांची नियमावली, त्याचे परिपूर्ण ज्ञान व माहिती आपल्या विद्यार्थी कलावंतांना व्हावी याकरिता विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुखांना या कार्यशाळेसाठी पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी