विडी व सफाई कामगारांची ईपीएफ कार्यालयासमोर प्रचंड निदर्शने -NNL


नांदेड|
जिल्ह्यातील विडी कामगार व कंत्राटी सफाई कामगारांना इपीएफ संदर्भातील आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर शेकडो कामगारांनी निदर्शने केली.  

नांदेड जिल्ह्यातील विडी व कंत्राटी सफाई क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो कामगारांची ईपीएफओची ईपीएफ नोंदीतील अनेक त्रुटी निघालेले आहे. या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ईपीएफओचे संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने कामगारांना त्यांच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात वारंवार कामगारांनी आणि संघटनेच्यावतीने पत्रव्यवहार करूनही ईपीएफओ कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे नांदेड येथील इंडस्ट्रीयल वर्कर्स युनियन संलग्न आयटक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज ईपीएफच्या विभागीय कार्यालयासमोर शेकडो कामगारांनी भरपावसात तीव्र निदर्शने केली.यावेळी ईपीएफचे साहाय्यक आयुक्त मा.राजदेरकर यांनी संघटना व कामगार प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. व्यवस्थापनाकडून संयुक्त डिक्लरेशन आल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत सर्व दुरुस्त्या केल्या जातील असे आश्वासन दिले त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. 

या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील देगलूर धर्माबाद कुंडलवाडी सह नांदेड शहरातील कंत्राटी सफाई कामगार विडी कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर कॉ.शिवाजी फुलवळे, औरंगाबाद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.मधुकर खिल्लारे भाकप जिल्हा सहसचिव, कॉ. नवसाजी हनुमंते, कॉ.संजय अंभोरे, कॉ. सुरेश ठोंबरे, कॉ.गणेश संधूपटला, कॉ.गुरू पुट्टा, कॉ.पद्माबाई तुम्मा, कॉ.शारदा ग्रुपवार, कॉ.वंदना वाघमारे यांच्यासह शेकडो सफाई कामगार विडी कामगार सहभागी झाले हाेते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी