अनोळखी मयत महिलेचा शोध, ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन -NNL


नांदेड। 
बंदाघाट येथील गोदावरी नदी पात्रात साधारणता 1 मार्च रोजी दुपारी 1.45 वा. एका अनोळखी मयत महिलेचा मृतदेह आढळला आहे. 

या महिलेचे वय साधारण 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे. या महिलेचा रंग सावळा असून अंगात काळ्या रंगाची ब्रा आहे. ही अनोळखी महिला मान, दोन्ही हात, आणि पोटा पासून खालचा भाग कापलेल्या अवस्थेत आढळली आहे. याबाबत पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे.

या मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटत असल्यास त्यांनी वजिराबाद नांदेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचा मो. 8788797077, 9923696860 तर दूरध्वनी क्र. 02462-236500 वर संपर्क साधावाअसे आवाहन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी