मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील घराची पडझड व शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकासानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
मुखेड तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात गेली ८ ते १० दिवस संततधार अतिवृष्टी पाऊस झाला असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करूण तात्काळ आर्थीक मदत द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड , दिगांबर मामिलवाड,अनिल अनिल घायाळे, बालाजी राठोड, किरण चव्हाण, गोपाळ पा. जाहुरकर, ,संदिप मुंडकर यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.