सिंध सेवा संगम च्या महिला शाखा महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी डॉ. सान्वी जेठवाणी यांची निवड -NNL

महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष तान्या भागवानी यांनी केली नियुक्ती


नांदेड।
जीए सिंध सेवा संगम ही राष्ट्रीय सामाजिक संस्था सिंधी समाजाच्या हितासाठी काम करणारी मध्यप्रदेश ला पहिली शाखा सुरुवात करून आज भारतभर आपले काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमाने सिंधी भाषा विकास करून सिंधी संस्कृतीचे जतन करणे व सिंधी समाजाचा प्रसार व्हावा व समाज हितासाठी काम करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही संस्था विविध राज्यांमध्ये आपली शाखा चालवत आहे. यात महाराष्ट्र राज्याचे महिला शाखेमध्ये प्रदेश सचिव म्हणून नांदेड येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व नांदेड येथील सुप्रसिद्ध कलावंत डॉ. सान्वी जेठवाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 

हे नियुक्ती 2022 पर्यंत करण्यात आली असून महिला संघटना करून सिंधी समाजाला प्रेरित करण्याचं काम यांच्या माध्यमाने व्हावं या हेतूने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र महिला शाखेच्या राज्य अध्यक्षा *तान्या मनोज खत्री, संजना खत्री, पल्लवी पुरश्वानी, गीता गोगिया, संस्थेच्या संस्थापक वर्षा गजारा, सोनिया खत्री, संजना खत्री यांच्या संमतीने सिंधी समाजाची प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

सान्वी जेठवानीजी यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रीत नानकानी राष्ट्रीय सरचिटणीस खुशी टेकचंदानी यांनी अभिनंदन केले आहे आणि आनंद व्यक्त केला आहे. सान्वी जेठवानी यांच्या नियुक्तीबद्दल महिला संघाने अभिनंदन केले. मध्य प्रदेशातील सर्व महिला शाखा अध्यक्षांनी अभिनंदन केले. महिला होऊन काही महिने झाले असताना एवढी मोठी जबाबदारी आपल्याला मिळाली असल्याचे आनंद देखील आहे पण तेवढेच जबाबदारीने मी हे काम करेन असे आश्वासन त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी