काहीजण अस्तित्व दाखविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असल्याचा भाजपचा प्रहार
नांदेड| लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या .या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा असून बहुतांश ग्रामपंचायतिवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाला आहे. लोहा तालुक्यातील उमरा, कौडगाव, हिराबोरी आणि घोटगी या ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले तर पिंपळगाव ढगे येथील सेवा सहकारी सोसायटीवरही भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन सदस्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेतली .यावेळी नवनिर्वातांचे खा. चिखलीकर यांनी सत्कार केला.
नांदेड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा यात समावेश होता . झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे . खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर निर्माण झाला आहे . खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या भागातील मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला कौल दिला आहे . लोहा तालुक्यातील उमरा, कौडगाव, हिराबोरी, घोटगी या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली आहे . सोबतच लोहा तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथील सेवा सहकारी सोसायटीवरही भाजपाने आपली निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांचा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सत्कार केला.
नवनिर्वाचित सरपंचांनी आपापल्या गावातील मूलभूत विकासासाठी प्रयत्न करावेत. निधीची कमतरता भासणार नाही . पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात भविष्यातही मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास खा. चिखलीकर यांनी यावेळी दिला. दरम्यान काही लोकप्रतिनिधी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत या ग्रामपंचायत निवडणुकीवर आपले वर्चस्व निर्माण झाल्याचे सांगत सुटले आहेत . वास्तविक जनसंपर्क नसलेल्या अशा लोकप्रतिनिधींनी फुकटचे श्रेय लाटू नये असा सल्ला भारतीय जनता पार्टी दिला आहे.
यावेळी उमरा ग्रामपंचायतचे सरपंच साईनाथ बालाजी पवार, उपसरपंच स्वप्निल मनोहर पाटील उमरेकर, सदस्य सचिन सिरसाट, सौ.आशाबाई राजेश सिरसाट, सौ.रुक्मिणीबाई मोतीराम जाधव, सुनील सोनटक्के, सावित्रीबाई राठोड, प्रयागबाई चव्हाण, संतोष पवार, शेषाबाई पवार, सतीश राठोड, सारजाबाई पवार, गोविंद राठोड या 14 सदस्यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील सावळे, डॉ.सचिन संभाजीराव पाटील उमरेकर, नागोराव पाटील सिरसाट, बालाजी पवार, पंचायत समिती सदस्य गुलाबराव उबाळे, शिवराज जोमेगावकर, पंजाब मोहनराव पाटील सिरसाट, संभाजी गोविंदराव पांचाळ, जनक बापूराव पवार, विश्वजीत गोविंदराव पाटील उमरेकर, मारुती सुभाषराव सिरसाट, राजेश नागोराव पाटील शिरसाट, चेतन सुभाषराव पाटील सिरसाट, किरण दिलीपराव सिरसाट, मरीबा जाधव, गणपती पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कौडगाव ग्रामपंचायतचे सरपंच कामाजी पाटील भरकडे, केशव पाटील कौडगावकर, अंताजी पाटील, हनुमंतराव पाटील, गोविंदराव पाटील कदम, गोविंदराव पाटील, राजेश पाटील भरकडे, प्रसाद पाटील भरकडे, प्रकाश पाटील भरकडे, उत्तम पाटील भरकडे, पांडुरंग पाटील भरकडे, बालाजी पाटील कदम, आनंदराव माली पाटील, जनार्दन पाटील भरकडे, माणिका पाटील भरकडे, प्रकाश पाटील भरकडे, माधव पाटील भरकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.घोटका ग्रामपंचायतचे सरपंच रामकिसन भागवत सुरनर, व्यंकट दौलतराव सुरनर, दस्तगीर सय्यद, लहू रामा, श्रीराम राठोड, वसंत चव्हाण, लक्ष्मण राठोड, बालाजी चव्हाण, प्रभाकर सुरनर, भगवान सुरनर, नरसिंग नागरे, मष्णाजी सुरनर, मष्णाजी रावसाहेब सुरनर, बालाजी रावसाहेब सुरनर, नारायण कांबळे, शिवशंकर दौलतराव सुरनर, संगमेश्वर सुरनर, दासू सुरनर, बालाजी वाघमारे, देविदास कांबळे, नाथराव सुरनर, मारुती सुरनर आदींची यावेळी उपस्थिती होती.