मला आमदार झाल्या सारखं वाटतं, चांदणं चांदणं झाली रातं,या बहारदार लावणीणे उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने बहारदार लावणीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित,इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट लावणी सम्राट श्री.किरण कोरे, कु.पुजा वाघमारे , कु.स्नेही मिस्त्री यांच्या सुप्रसिद्ध बहारदार लावणीच्या ठुमक्यावर चोंडीकरासह पंचक्रोशीतील तरूणाई थिरकल्याचे चित्र पहावयास मिळाले.
किरणे कोरे प्रस्तुत लावणीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आराध्य दैवत गणरायाच्या पुजन करून या कार्यक्रमाची सुरूवात वंदन गितांने सुरुवात करण्यात आली यानंतर चंद्रा, मला आमदार झाल्या सारखं वाटतं , बैलगाडा शर्यत, केळेवाली , ओ..शेट , बाई वाड्यावर या ,चांदणं चांदणं झाली रात या लावणीसह हिंदी चित्रपट गाण्याच्या व नृत्याच्या माध्यमातून किरण कोरे यांनी तरुणांना व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देत समाज प्रबोधनाचे धडे दिले.
या कार्यक्रमास प्रा.प्रकाश बसापुरे, सचिन कांबळे,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मुजाहिद भाई चोंडीकर , तय्यब पठाण,साईनाथ पांचाळ, गिरीष चोंडीकर , राजेश बाच्चेगावे, संतोष भंडरवार, युवा नेतृत्व सरपंच प्रतिनिधी आदित्य पाटील चोंडीकर ,पत्रकार रणजित जामखेडकर,राम कंधारे ,पोलिस जमादार चातरवाड , होमगार्ड. जाफर ,काळेवार, गंगासागरे,शशिकांत देवकत्ते, माधव दंडलवार, शिवकुमार बोडके, राहुल पाटील , हणमंत नंदे, रामचंद्र नागमोडे, रामेश्वर चिटकलवाड, सद्दाम शेख, शंकर मसुरे, संगम आच्चेगावे, हणमंत भंडरवार, माधव देवकत्ते, राजु बोडके , शिवाजी आच्चेगावे यांच्या सह चोंडी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पंचक्रोशीतील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.