हिमायतनगरातील हिंदू -मुस्लिम एकसंघतेची परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठी मंडळांनी प्रयत्न करावे - मा.आ. नागेश पाटील आष्टीकर -NNL

बजरंग गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद  

मंडळाच्या युवकांचे सामाजिक दायित्व प्रशंसनीय असल्याचे सांगून नागेश पाटिल यांनी केलं कौतुक  


हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील दोन वर्ष कोरोना काळाने जनजीवन अस्तव्यस्त केले होते. ते संकट विघ्णहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाने टळले असून, त्यामुळे आपण गणेशोत्सव आनंदाने साजरा करत आहोत. सन - उत्सव साजरे करताना मंडळाच्या सदस्यांनी व्यर्थखर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम राबविले पाहिजे. सामाजिक दायित्वाची जाणीव करून देणारा रक्तदान हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग गणेश मंडळ राबवितात. हि बाब प्रशंसनीय असून, यामध्ये सर्व  समाजाचे बांधव रक्तदान करत असल्याने हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा यातून दिसते आहे. मागील अनेक वर्षांपासून चालणारे हि परंपरा कायम टिकवून राहावी यासाठी उत्सव साजरे करताना गणेशभक्तांनी सामाजिक जाणीव ठेऊन कोणतेही गालबोट न लागू देता विसर्जन करावे. असे आवाहन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. 


ते हिमायतनगर शहरातील पोलिस स्थानकासमोरील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात श्री बजरंग गणेश मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणपती बाबाच्या उत्सवाचे औचित्य साधून दि.०६ सप्टेंबर मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब शेवाळे, परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यासख महाविरचंद श्रीश्रीमाळ, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी श्यामजी रायेवार, पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, कृउबाचे माजी गजानन तूपतेवार, प्रवीण जन्नावार, राजीव बंडेवार, पांडुरंग तुप्तेवार आदींची उपस्थिती होती.  


सुरुवातीला हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार तथा नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर व मान्यवरांनी प्रथम गणपती बाप्पाच्या विशाल महाकाय मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी मंडळाने स्थापन केलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिमेच्या देखाव्याबद्दल मंडळाच्या युवकांचे कौतुक केले. त्यानंतर लागलीच मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात पोलीस निरीक्षक बिडी भुसनूर आणि मुस्लिम समाजाच्या युवकाने रक्तदान देऊन केली. याप्रसंगी पुढे बोलताना आष्टीकर म्हणाले कि, मंडळाच्या वतीने सतत गणेशोत्सव पर्वकाळात रक्तदान, महाप्रसाद, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत व अन्न - धान्याचे वितरण आदीसह विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविले जातात. येथे राबविल्या जाणाऱ्या नवनवीन उपक्रमामुळे संबंध नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर येथील गणेश मंडळाचे नाव चर्चेत असते. असे उदगार काढून गणेश मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत सर्वाना गणेशोत्वाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात शहरातील सर्व समाजातील तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबारातील युवकांनी दान केलेल्या रक्ताचा साठा करण्यासाठी जनकल्याण साखळी आणि वैद्यकीय सेवा संलग्नित श्री गुरु गोविन्दसिंघजी सेवा प्रतिष्ठान संलग्नित गोळवलकर गुरुजी रक्तपेढी, हिमायतनगर येथील ओम क्लिनिक हिमायतनगरच्या रक्तपेढीचे डॉक्टर आणि आणि जिजाई ब्लड सेंटर नांदेडच्या चमूने मेहनत घेतले. या कार्यक्रमास संतोष अप्पा पळशीकर, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल राठोड, डॉ. आनंद माने, शिवसेना संघटक संजय काईतवाड, अरविंद पाटील, बाळू चवरे, गजानन मुत्तलवाड, शंकर पाटील, श्रीरंग कांबळे, फेरोज खान युसुफ खान, डॉ.शिवप्रसाद लखपत्रेवार, डॉ.गणेश कदम, डॉ.प्रसंन्न रावते, डॉ.देवसरकर, जाफर लाला, विलास वानखेडे, संजय माजळकर, पांडुरंग तुप्तेवार, अन्वर खान, सदाशिव सातव, विठ्ठल शिंदे, राम नरवाडे, यांच्यासह पत्रकार, शेकडो रक्तदाते युवक, पोलिस कर्मचारी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग मंडळाचे गजानन चायल, कुणाल राठोड, आशिष जैन, प्रकाश रामदिनवार, ज्ञानेश्वर बास्टेवाड, मंगेश धुमाळे, वैभव डांगे, आदींसह गणेश मंडळ व बजरंग दलाच्या युवकांनी परीश्रम घेतले. 





Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी