नविन नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा तालुका युवा सेना प्रमुखपदी कांकाडी येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष देशमुख यांच्यी निवड करण्यात आली असून युवा सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड तालुक्यातील शिवसेनेचे निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष देशमुख कांकाडीकर यांनी आंदोलन व विविध आयोजित कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला होता तर विकासात्मक कामासाठी आग्रही होते, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे व युवा सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या आदेशावरून जिल्हा युवाधिकारी प्रमुख व्यंकटेश मामीलवाड यांनी युवा सेना नांदेड दक्षिण विधानसभा तालुका पदी नियुक्ती केली असून या निवडीचे पत्र सिडको येथील निष्ठावंत निर्धार मेळाव्यात १२ सप्टेंबर रोजी युवा सेना चे सचिव वरूण सरदेसाई व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. या निवडीबद्दल दक्षिण तालुका युवा सेनिकात नवचैतन्य निर्माण झाले असून देशमुख यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.