कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन वेळीच करा - तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे -NNL


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
किनवट तालुक्यात बऱ्याच ठिकाणी  पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.

कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण  पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. कापूस सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.त्या साठी वेळीच आकस्मिक मर रोगावर वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे असे मत किनवट तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना एका परिपत्रके द्वारे दिली माहिती. 

कपाशीचे आकस्मिक मर व्यवस्थापन

१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.व वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.सोबतच लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी किंवा,१ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांचेशी संपर्क करा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी