किनवट,माधव सूर्यवंशी| किनवट शहरालगत असलेल्या गोकुंदा शहरातील दत्तनगर भागातून एका तेरा वर्षीय अल्पवईन मुलीचे अपहरण करण्याचा डाव अपहरण झालेल्या मुलीच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना आज दिनांक 23 चे दुपारी बारा वाजले ते तीनशे सुमाराची आहे.
किनवट पोलीस स्टेशन हद्दीतील किनवट शहरालगत असलेल्या गोकुंदा येथील दत्तनगर भागात आज दिनांक 23 सप्टेंबरचे दुपारी बारा वाजण्याची सुमारास दत्तनगर भागात राहणारी श्वेता दत्ता झळके वय तेरा वर्ष ही मुलगी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना अचानक तिच्या पाठीमागून एक ऑटो आला. आणि तिला ऑटो मध्ये ओढण्यात आले तिला थापड बुक्क्या मारून तिच्या तोंडावर रुमाल टाकून तिला बेशुद्ध करून किनवट रेल्वे स्थानका परिसरात घेऊन गेल्याचे मुलीने स्वतः सांगितले. मुलीला दोन वाजण्याचे सुमारास होश आल्याने तिने त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेऊन पळ काढला.
नेमकी त्याच वेळेला नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर आली होती त्यामुळे प्रवाशांची गर्दी असल्याने त्या मुलीला गर्दीचा फायदा घेत आपले घर गाठले. तिने आपल्या सोबत घडलेली सर्व हकीगत आपल्या घरी आईला आजीला सांगितल्याने सदरील मुलीला तातडीने त्या भागातील काही लोकांनी पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी याबाबत चौकशी करून त्या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठवले. बातमी लिहीपर्यंत याप्रकरणी अत्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नेमके या मुलीचे या मुलीचे अपहरण का केल्या गेले अपहरण करता कोण होता? मुलीच्या सांगण्यावरून त्या ऑटो मध्ये एक बुरखा घातलेली महिला व ऑटो चालक पुरुष असे दोघेजण होते. नेमके दोघेजण ते कुठून आले होते तो किनवट शहरातील होते का.. गोकुंदा शहरातील होते का.... बाहेर जाऊन आले... असे अनेक प्रश्न या घडलेल्या अपहरण प्रकरणानंतर चर्चिविले जात आहे. नुकतेच सगळीकडे मुलांचे अपहरण होण्याच्या चर्चा होत आहेत. अनेक ठिकाणी अनेक लोकांनी व्हाट्सअप फेसबुकवर व्हिडिओ वायरल केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. किनवट शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र चर्चा व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किनवट पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करीत असून, नक्की अपहरण करता कोण आपण करण्यामागचे कारण काय..? हा झालेला प्रकार काय..? याबाबत सर्व चौकशी होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले चर्चेविले जात आहे.