नांदेड| अण्णाभाऊ साठे यांचे जिवन चरित्र्य शाहीरीतून साकारणारे शाहीर सिताराम नारायण कंधारे (वय 73 ) यांचे दि. 10 सप्टेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्यावर गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिताराम कंधारे यांनी गीतगायन व शाहिरीतून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आयुष्यभर प्रसार व प्रचार केला. मूळ गांव वडेपुरी ह.मु.नवीन कौठा नांदेड येथे वास्तव्य असलेले सिताराम कंधारे यांच्या मागे दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे.