गुरुवर्य एम.पी.भवरे स्मृती पुरस्कारांची घोषणा -NNL

अभिनेता एस.व्ही रमणा, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, पत्रकार रामचंद्र देठे यांचेसह २० व्यक्ती सन्मानित होणार


नांदेड|
सन २०२१/२०२२ वर्षाचे  गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आल्याची माहिती बहुजन टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष  त्रिरत्नकुमार भवरे यांनी दिली आहे. पुरस्कार निवड समितीचे सिनेअभिनेता डाॅ. प्रमाेद अंबाळकर ,डाॅ.पी.बी.नामवाड ,यशवंत थाेरात यांनी पुरस्कार घाेषित केले.

पुरस्कार घोषित व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत. अभिनेता दिग्दर्शक एस.व्ही. रमणा,(राज्यस्तरीय सेवा गौरव), हास्यसम्राट-झी टीव्ही स्टार सिद्धार्थ खिल्लारे (उत्कृष्ट कला गौरव) , पत्रकार तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे (पत्र भूषण), स्वियसहाय्यक जि.प.बालाजी नागमवाड(सेवा गौरव), समाजसेविका श्रीमती विजया काचावार ((सेवा गौरव), विस्तार अधिकारी प.स.लोहा डि आय गायकवाड (सेवा गौरव), समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.जी.वागतकर(सेवा गौरव), जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प. मिलिंद व्यवहारे (सेवा गौरव)समतादूत दिलिप सोंडारे(सेवा गौरव) समाज सुधारक कैलास गायकवाड (सेवा गौरव), वनाधिकारी श्रीकांत जाधव (कर्तव्यदक्ष अधिकारी) वनाधिकारी अनिल रासने (कर्तव्यदक्ष अधिकारी),सपोनि बी.जी.महाजन (कर्तव्यदक्ष अधिकारी), वनाधिकारी एस.डी.हराळ(कर्तव्यदक्ष अधिकारी) कृषी अधिकारी पुंडलिक माने(कर्तव्यदक्ष अधिकारी), मुख्याध्यापक सरसम गजानन सुर्यवंशी (आदर्श मुख्याध्यापक), सहशिक्षक समाधान सुर्वे (आदर्श शिक्षक) वनपाल अण्णासाहेब वडजे (सेवा गौरव) सहशिक्षक गोपाल तुमल्लवार (आदर्श शिक्षक), वनपाल अमोल कदम(सेवा गौरव).

अशा या साेहळ्याचे स्वागताध्यक्ष बालाजी राठोड, रफीकभाई शेठ, निमंत्रक कैलास भाऊ माने पोटेकर हे आहेत. तर हा साेहळा यशस्वी व्हावा म्हणून विशेष परिश्रम लक्ष्मणराव मा.भवरे , डॉ,मनोज राऊत, यशवंत थोरात,किरण वाघमारे, शाहीर नागोराव मेडेवाड, शिवाजी डोखळे, अविनाश कदम,जळबा जळपते, परमेश्वर वालेगावकर,केशव माने,प्रकाश कदम,गौतम राऊत,शेख खय्युम, नागनाथ वच्छेवाड,शाहीर गाडगे , बापुराव कदम , शाहीर पांडुरंग हापसेवाड, शेषेराव थावरा, रमेश नारलेवाड, किशनराव ठमके, नरेंद्र दोराटे,राहुल लोणे.रमेश कांबळे सरसमकर, जयभीम पाटील,लोकेश कावळे उमरीकर प्रशांत विनायते यांच्यासह अनेक कार्यकर्ते घेत आहेत.संचालन किनवटचे उत्तम कानिंदे करणार आहेत. 

पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते  गौरव असे आहे.पुरस्कार वितरण १८ सप्टेंबर रविवारी रोजी पोटा बु.ता.हिमायतनगर येथे आयोजित लोककलावंत शाहीर मेळाव्यात करण्यात येणार आहे असेही त्रिरत्नकुमार भवरे यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी