अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या सरसकट शेतकर्‍याना हेक्टरी ५० हजार मदत करुन पिक विमा मंजुर करावा -शंकर महाजन - NNL

नांदेड| देगलुर बिलोली मतदारसंघात ९ सप्टेबंर रोजीपासुन पुन्हा एकदा चालु झालेल्या आतीमुसळधार पावसामुळे सर्वच शेतकरी बांधवाच्या खरीब पिंकाचे नुकसान झाले आहे. यातून आता हाती काहीच येणार नसल्यामुळे सरसकट सर्वच शेतकर्‍याना हेक्टरी ५० हजार मदत करुन पिक विमा मंजुर करावा अशी मागणी शंकर महाजन यांनी केली आहे.


दि ९ सप्टेंबर २०२२ रोजी पासुन देगलुर बिलोली मतदार संघात तीन दिवसा पासुन वादळी वार्‍यासह अती मुसळधार पाउस होत आहे. यात खरीब पिक मुग उडीद सोयाबीन कापुस ईतर पिका सह भाजीपाले फळबाग याचे आतो नात नूकासन झाले आहे. असे तक्रर जिल्हाधिकारी,मुख्यंमञी साहेब, विभागीय आयुक्त औरगाबाद, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, याच्या कडे वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी ईमेल द्वारे केले आहे.

तसेच या आगोदर पानी न पडल्यामुळे ३०% पिक हे करपुन गेले आहे. तर आता सतत मुसळधार पाउस पडुन सोयाबीन उडीद मुग कापुस ईतर पिकाचे आतोनात नुकसान देगलुर-बिलोली मतदासंघाती सर्वच शेतकर्‍याचे व पिकाचे नुकसान झाल्या मुळे सरसकट तात्काळ हेक्टरी ५० हजार मदत द्यावे व पिक विमा मंजुर करावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी केली आहे.तसेच प्रशासन शेतकर्‍याना नूकसान भरपाई व पिक विमा त्वरीत मंजुर न केल्यास पुढील काळात शेतकर्‍याना सोबत घेउन जनअंदोलन ईशारा ही वंचित बहुजन आघाडी कडुन देण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी